Close Visit Mhshetkari

CBSE Pattern Formula : एक एप्रिल पासून राज्यात सीबीएससी पॅटर्न; कशी असणार शैक्षणिक सत्र व नियोजन पहा सविस्तर…

CBSE Pattern Formula : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याची घोषणा शिक्षण मंत्री श्री.दादा भुसे यांनी नुकतीच विधिमंडळात केलेली आहे महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये “सीबीएससी अभ्यासक्रम” लागू करण्यासाठी सुकाणू समितीने मान्यता दिलेली आहे.

मित्रांनो आता प्रश्न पडतो तो की सीबीएससी पॅटर्न लागू करायचा झाल्यास शिक्षक विद्यार्थी तर असतील का शिक्षणाचा फॉर्मुला काय आहे ? तर यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

How is CBSE Pattern Formula ?

सन 2025 26 शैक्षणिक वर्षापासूनची बीसी अभ्यासक्रम लागू करण्याच्या हालचाली आता सुरू झालेले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थी परिषदेत या संदर्भात माहिती दिलेली आहे. 1 एप्रिल 2025 पासून सीबीएससी चे वर्ग इयत्ता पहिलीपासून सुरू होणार आहे या संदर्भातली कार्यवाही सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली पाठ्यपुस्तक छापायचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा विचार करायचा झाल्यास 70 30 फॉर्मुला राबवला जाणार आहे त्यामध्ये 70 टक्के सीबीएससी तर 30 टक्के राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे भाषा आणि इतिहास विषयात कोणताही बदल किंवा तडजोड केली जाणार नसल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे.

CBSE syllabus मधील इतिहास विषयात राज्य शिक्षण अखेरतील 30 % छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ताराबाई मराठी साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा ~  School Education : राज्यातील शाळा संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आता प्रत्येक शाळेत ...

सन 2025 26 सालासाठी इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम सीबीएससी पॅटर्नवर तयार करण्यात येणार असून दरवर्षी एकेक येथे चा अभ्यासक्रम बदलत जाणार आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

School Exam Timetable 2025

राज्यातील शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक कोलमंडीची भीती शिक्षण तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिक्षण विभागाकडून अचानक इयत्ता पहिलीपासून नव्या येथे पर्यंत एप्रिल अखेरपर्यंत वार्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

वार्षिक परीक्षा नियमित वेळापत्रकाप्रमाणे व्हावी अशी शिक्षक व पालकांची मागणी आहे,परंतु प्रशासनाने याबाबतीत आणि मोठी भूमिका घेतल्याने पालक व शिक्षक वर्गात अगोदरच नाराजी पसरलेली आहे.त्यातच कोणतीही तयारी नसताना एक एप्रिल पासून सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शाळा सुरू करण्याचे निर्णयाने आणखीनच गोंधळ निर्माण झाला आहे.

School exam Result

दि.23 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर आठवड्याभरात म्हणजेच 1 मेपासून सुट्टी द्यायची असल्याने फक्त चार-पाच दिवसात पेपर तपासणी करून निकाल बनवण्याची मोठे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिलेले आहे.भर उन्हाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या व इतर अडचणी असताना शाळेतील मुलांना एप्रिल अखेर परीक्षा देण्यास भाग पाडून सरकारने मोठा गोंधळ उडवलेला आहे.प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं मुख्यध्यापकांच्या संघटनेचं म्हणणं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!