CBSE Board Exams : सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहे.सदरील परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे.आता नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे.
CBSE Board Exams 2024
नवीन सत्र आणि अभ्यासक्रम
- नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल.
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 विषय अनिवार्य आणि 2 ऐच्छिक असतील.
- बारावीसाठी 7 विषय अनिवार्य असतील.
सीबीएसईने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण
माध्यमिक” (9वी आणि 10वी) आणि “वरिष्ठ माध्यमिक” (11वी आणि 12वी) अशा दोन श्रेणींमध्ये केले आहे.
इयत्ता 10 वी साठी अनिवार्य विषय (5)
- भाषा 1 (इंग्रजी)
- भाषा 2 (हिंदी/मराठी/इतर)
- गणित
- विज्ञान
- सामाजिक शास्त्र
ऐच्छिक विषय (2)
- कौशल्य विषय (जसे की, कॅरियर शिक्षण, उद्योजकता)
- सामान्य अध्ययन
- आरोग्य आणि शारीरिक शिक्षण
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार ऐच्छिक विषय निवडता येतील.नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल.
विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावरही लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सादर करण्यात येईल आणि उर्वरित इयत्तांचा अभ्यासक्रम आधीच्याच पाठ्यपुस्तकांसह सुरू राहणार आहेत.
CBSE Syllabus 2024-2025 PDF
सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.सन 2024-25 साठीच्या CBSE इयत्ता दहावी आणि बारावी अभ्यासक्रमासंदर्भात सूचना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर www.cbseacademic.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे
- सर्वप्रथम सीबीएसईच्या www.cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- सत्र 2024-25 साठी माध्यमिक आणि उच्च शालेय अभ्यासक्रम’ या मेनूवर क्लिक करा
- PDF फाइल उघडण्यासाठी लिंकवर क्लिक करा
- ही PDF फाइल डाऊनलोड करा.