Car Mileage : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. गाडी चालवताना आपल्याला अधिक ऍव्हरेज कसे मिळेल याची प्रत्येकाला काळजी असते.
मायलेज वाढवण्यासाठी गाडीच्या सर्विसिंग पासून गाडीची योग्य निकाल कशी राखावी याविषयी चर्चा केल्या जातात. आज आपण ‘मायलेज’ वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स् आपण पाहूयात..
How To Increase Car Mileage
गाडी नीट चालवा : – ताशी 70-80 KM हा वेग चांगले ‘मायलेज’ साठी उत्तम असतो. यापेक्षा अधिक वेगाने गाडी चालावल्यास इंधन जास्त खर्च होते.
गिअर वेळेत बदला :- कमी गिअरमध्ये पिक-अप जास्त मिळतो म्हणून तसे करण्याची अनेकांना सवय असते. मात्र त्यामुळे इंजिनवर ताण येऊन ‘मायलेज’ खूप कमी होते.
घाट रस्त्यात गिअरचे समीकरण :- चडरस्ता किंवा घाट रस्ता चढत असताना अनेकदा ताशी 10-15 KM च्या वेगासाठीदेखील पहिला गिअर गरजेचा असतो. दुसरा गिअर टाकला तर गाडी नीट चढत नाही, परिणामी इंजिनवर ताण येतो. थोडक्यात चढावर कार चालवण्याचा नीट सराव असायला हवा.
ट्रॅफिकमध्ये न्यूट्रलवर ठेवा : शहरामध्ये किंवा वाहतूक कोंडी झाल्यास गाडी केव्हाही पहिल्या गेअर वर ठेवू नये थोडे कष्ट पडतील परंतु गाडी जर न्यूटन असेल तर आपल्या ‘ मायलेज’ मध्ये नक्कीच वाढ होईल.
थोडक्यासाठी कार बंद :- मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सिग्नल सुटायला 20-30 सेकंद असतात. अशावेळी बरेच जण इंधन बचत करण्याच्या उद्देशाने आपली कार बंद करतात. परंतु मित्रांनो यामुळे इंधन बचत न होता इंजन चालू करण्यासाठी अधिक इंधनचा वापर होतो.
गाडीला झटके बसणे :- बऱ्याच वाहनचालकांना वेग वाढवताना झटके देण्याची सवय असते. मित्रांनो ही पद्धत ‘मायलेज’साठी अतिशय प्रतिकूल असते. गाडीचा वेग वाढवणे असो किंवा गाडी थांबवणे असो, ते हळूवारपणेच केले पाहिजे.
टायर मधील हवा : – वाहन कंपनीने हवेचा जो दाब सांगितला आहे, तो कायम ठेवला पाहिजे.नियमितपणे टायर मधील हवेचा दाब तपासत राहावा. जेवढी हवा कमी, ‘मायलेज’ तेवढंच कमी होते.
‘सर्व्हिसिंग’ :- गाडी मेन्टेनन्सला गेल्यावर इंजिन ऑईल बदलले जाते. ऑईल वेळेत बदलले नाही तर इंजिनातील भागांमधलं घर्षण वाढल्यामुळे इंजिनला इंधन अधिक लागते, परिणामी ‘मायलेज’ कमी होले.
खिडक्या बंद : – मित्रांनो महामार्गांवर प्रवास करताना खिडक्या उघड्या ठेवू नये, यामुळे गाडीचे एरोडायनॅमिक्स बिघडते आणि गाडीला मागे खेचणाऱ्या तत्वाचे (ड्रॅग) बळ वाढते, ज्यामुळे इंजिनला जास्त काम करावे लागते आणि ‘मायलेज’ कमी होते.