Car Loan tips : नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्याला माहितीच आहे की आजकालच्या जमान्यामध्ये चार चाकी वाहन खरेदी करणे हे नित्याचे आणि अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे.
आता चार चाकी वाहन खरेदीसाठी आपल्याला सहाजिकच कर्जाची आवश्यकता असते,अशा वेळी वाहन कर्जा संबंधित सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
वाहन कर्ज मराठी माहिती
ज्याप्रमाणे घर किंवा इतर कारणासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते.त्याचप्रमाणे वाहन कर्ज सुद्धा आपल्याला बँकेतून घ्यावे लागते.यामध्ये आपण नवीन कार किंवा सेकंड हॅन्ड म्हणजे जुनी काकार सुद्धा घेऊ शकतो.
दोन्ही कार्याला दोन्ही पण खरेदीसाठी बँकेकडून आपल्याला कर्ज मिळू शकते परंतु दोन्ही कर्जासाठी व्याजदर मात्र विविध असतात,जसे की, नवीन कार घेण्यासाठी 9.25 -13.75 तर जुन्या चार चाकी वाहनांसाठी 12.50 ते 17.50 इतका व्याजदर असतो.
कार लोन कोणाला मिळू शकते?
कार लोन घेण्यासाठी मित्रांनो काही बाबींची पूर्तता आपल्याला करावी लागते, जसे की आपले वय, आपले उत्पन्न, तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमच्या पगार किती आहे?त्याचबरोबर आपले क्रेडिट हिस्टरी कशी आहे ? या सगळ्या बाबींचा विचार करून बँका आपल्याला कार लोन देत असते.साधारणपणे 18 ते 65 वयापर्यंतच्या व्यक्तींना बँके कडून उपलब्ध करून देण्यात येते, मात्र त्यासाठी वरील अटी किंवा बाबी पूर्ण करणे आवश्यक असतात.
कार लोन आवश्यक कागदपत्रे
- ओळख पत्र ( आधार कार्ड, पासपोर्ट, ड्राईविंग लायसन्स इत्यादी)
- मतदान ओळख पात्र
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- गाडीचे कागद पत्रे
- मागील तीन महिन्याचे सॅंलरी स्लिप
- मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- आयकर भरलेली पावती
Car loan EMI Calculator
स्वत:ची कार खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी कार लोन हा एक उत्तम आर्थिक पर्याय आहे. पण कार खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कम आपल्या जवळ नसल्यास \’कार लोन ईएमआय\’ कॅल्क्युलेटर कर्जाचा हप्ता सांगू शकते.
ज्यामध्ये नियमित अंतराने सोप्या मार्गाने ईएमआय भरणे आवश्यक आहे. ईएमआय कॅल्क्युलेटर आपल्याला कर्जाच्या संदर्भात एकूण रक्कम अंदाज बांधण्यास मदत करते.
Car loan EMI calculator benefits
कार लोन ईएमआय कॅल्क्युलेशनने आपली कार हफ्त्यांमध्ये किती रक्कम जाईल ? याचा अंदाज येतो.यामुळे EMI भरण्यासाठी ठेवलेल्या रकमेचे स्पष्ट विश्लेषण केले जाते. हप्त्यांची रक्कम जाणून घेतल्यास आपल्याला कार खरेदीसाठी किती खर्च करावा लागतो आहे हे ठरवण्यास मदत होते.परिणामी दर महिन्याला त्यासाठी किती रक्कम बाजूला ठेवणे आवश्यक आहे? हे समजण्यास मदत मिळते.