Car loan EMI : आजकाल, वेगवेगळ्या फीचर्स आणि आकर्षक लुक असलेल्या कार बाजारात सतत लाँच होत आहेत.अनेक वेळा आपण या फीचर्स आणि डिझाईनमुळे आकर्षित होऊन कार खरेदी करण्याचे ठरवतो.
कार खरेदी करताना बँक किंवा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणे आवश्यक असते,परिणामी मोठ्या EMI चा ताण आपल्या बजेटवर येतो. तेव्हा कार खरेदी करताना खालील बाबींचा विचार आपण नक्की करावा.
Car loan EMI Tips
कारची किंमत आपल्या वार्षिक पगाराच्या निम्म्यापेक्षा कमी असावी.उदाहरणार्थ, जर तुमचा वार्षिक पगार १० लाख असेल, तर ५ लाखांपर्यंत ची कार निवडा. जर वार्षिक पगार १५ लाख असेल, तर ७.५ लाखांपर्यंतची कार निवडावी.जर वार्षिक पगार २० लाख असेल,तर १० लाखांपर्यंतची कार खरेदी करावी.
वाहन कर्ज २०:४:१० फॉर्म्युला
२०% डाउन पेमेंट : कारच्या किमतीच्या किमान २०% डाउन पेमेंट करा. ही रक्कम तुमच्या वार्षिक पगाराच्या २०% पेक्षा जास्त नसावी.
४ वर्षे कर्ज कालावधी : कर्जाचा कालावधी ४ वर्षांपेक्षा जास्त नसावा.
कार लोन च हप्ता: मित्रांनो आपण खरेदी केलेल्या कारचा EMI आपल्या मासिक पगाराच्या १०% पेक्षा जास्त नसावा.
कार लोन टिप्स
- डाउन पेमेंट जास्त केल्यास, कर्जाची रक्कम कमी होते आणि EMI चा ताण कमी होतो.
- कर्जाचा कालावधी कमी ठेवल्यास, एकूण व्याज कमी भरावे लागते.
- वेगवेगळ्या बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या व्याजदरांची तुलना करा आणि सर्वोत्तम ऑफर निवडा.
- जर शक्य असेल, तर EMI व्यतिरिक्त अतिरिक्त पेमेंट करून कर्ज लवकर फेडा.
- कारचे इन्शुरन्स करणे अनिवार्य आहे. त्यासाठी अतिरिक्त खर्च येतो.
- कारच्या ऑन-रोड किंमतीमध्ये रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन खर्च समाविष्ट असतो.
कारच्या नियमित सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्ससाठी अतिरिक्त खर्चाची तयारी ठेवा.