Car EMI Tips : पगाराच्या हिशोबाने किती महागडी कार खरेदी करावी? जाणून घ्या गणित; अन्यथा बिघडेल बजेट..

Car EMI Tips : आजकाल,सातत्यानंच वेगवेगळ्या फीचर्स आणि लूक असलेल्या कार लाँच केल्या जात आहेत.अनेक वेळा आपण सुद्धा लूक आणि फीचर्समुळे आकर्षित आकर्षित होतो आणि एखादी कार खरेदी करण्याचे मन तयार करतो.

साहजिकच आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी आपल्याला बँकांकडे जावे लागते.कार खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेचे कर्जही घेतो पण नंतर मोठ्या रकमेमुळे हप्ताही मोठा बसतो आणि यामुळे आपले बजेट ट्रेन रुळावरून घसरते.

कार खरेदी करताना घ्या ही काळजी

आपल्याला येणाऱ्या समस्या टाळायच्या असतील तर आपण आपल्या बजेटनुसार कार खरेदी करावी. जर आपण खालील कॅल्क्युलेशन प्रमाणे, पगाराच्या हिशोबाने नियोजन केले तर तुमची कारची आवड आणि गरजही पूर्ण होईल. विशेष म्हणजे तुमचे बजेटही कोलमडणार नाही.

आपण जर कार खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवावे की आपल्या कारची किंमत आपल्या वार्षिक पॅकेजच्या निम्म्यापेक्षा कमी असावी. समजा आपले वार्षिक पॅकेज १० लाखांचे असेल तर आपल्याला ५ लाखांपर्यंत किंमत असलेली कार खरेदी करता येईल. जर आपले वार्षिक पॅकेज १५ लाखांचे असेल तर आपण ७.५ लाख रुपयापर्यंतची कार खरेदी करू शकतो.शेवटी आपले वार्षिक पॅकेज २० लाखांचे असेल तर आपत १० लाखांपर्यंतची कार खरेदी करू शकतो.

Car loan EMI Calculations

आपण खरेदी करत असलेल्या कारच्या ऑन-रोड किंमतीबरोबरच याशिवाय, कार खरेदी करताना, आपल्याला डाउन पेमेंट, कर्जाची रक्कम आणि EMI Calculations देखील करावे लागेल.

जर आपण खालील फॉर्म्युल्यानुसार कार खरेदी केली तर आपल्याला आपल्या बजेटमध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही.कार खरेदी करताना नेहमी २०:४:१० फॉर्म्युला लक्षात ठेवा.

  • फॉर्म्युल्यातील २० म्हणजेच २० % डाऊन पेमेंट होय,हे तुमच्या वार्षिक पगाराच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
  • आता ४ म्हणजे ४ वर्षे होय म्हणजे कर्जाचा कालावधी ४ वर्षांपेक्षा जास्त नसावा.
  • शेवटी १० म्हणजे १० %, म्हणजे EMI ची रक्कम वार्षिक निम्म्या पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.

Leave a Comment

error: Don't Copy!!