BSNL Recharge Plan : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक स्वस्त आणि दमदार रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. मित्रांनो,हा प्लॅन डेटाशिवाय मिळणार आहे.ज्या ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि SMS सुविधांची गरज आहे.
BSNL New Recharge Plan
439 रुपयांचा BSNL प्रीपेड प्लॅन काय आहे खास?BSNL 439 रुपयांचा प्रीपेड प्लॅन मध्ये ग्राहकांना मिळणार आहेत खालील महत्त्वाच्या फॅसिलिटी किंवा सुविधांचा लाभ
- प्रीपेड प्लॅन – 439 रुपये
- अनलिमिटेड कॉलिंग – भारतभर कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग
- दररोज 300 SMS मोफत
- फ्री नॅशनल रोमिंग – दिल्ली आणि मुंबईसह MTNL क्षेत्रांतही लागू
- एकूण 90 दिवसांची वैधता
थोडक्यात ग्राहकांना दिवसाला फक्त 4 रुपये 90 पैसे खर्च करून ग्राहकांना BSNL च्या सेवा वापरता येणार आहेत. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा सुविधा उपलब्ध नसल्याने इंटरनेटसाठी वेगळा रिचार्ज करावा लागेल.
Airtel, Jio, Vi Recharge plan
BSNL ने आपल्या स्वस्त आणि लांब कालावधीसाठी असलेल्या प्लॅनमुळे Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) यांसारख्या खाजगी कंपन्यांना मोठी स्पर्धा दिली आहे. अतिशय कमी किमतीत जास्त फायदे मिळत असल्याने या सरकारी कंपनीकडे ग्राहकांचा ओढा वाढलेला असून बीएसएनएल कंपनी ग्राहकांसाठी उत्तम पर्याय बनलेला आहे.
▪ सरकारकडून 6,000 कोटींचे आर्थिक पॅकेज – BSNL आणि MTNL च्या नेटवर्क अपग्रेडसाठी केंद्र सरकारने मोठी मदत दिली आहे.
▪ 4G विस्तार आणि 5G टेस्टिंग सुरू – BSNL ने आतापर्यंत 65,000+ 4G टॉवर्स कार्यान्वित केले असून लवकरच हा आकडा 1 लाखांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.
▪ नवीन ग्राहक जोडण्यावर भर – स्वस्त आणि दीर्घकालीन प्लान्ससह BSNL आपल्या ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
New mobile recharge plan
मित्रांनो असे असले तरी नेटवर्कच्या बाबतीत कंपनीकडून फारशी सुधारणा दिसून येत नाही.BSNL नेटवर्कच्या स्पीड,कॉल ड्रॉप समस्या आणि नेटवर्क स्थिरतेबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. याचाच परिणाम म्हणजे BSNL ला गेल्या चार महिन्यांत 3 लाखाहून अधिक ग्राहक गमवावे लागले आहेत.
थोडक्यात आपण जर फक्त डेटा वापरत नसाल आणि कॉलिंग आणि SMS साठी आपल्याला चांगला प्लॅन हवा असल्यास आपणास BSNL चा 439 रुपयेचा 90-दिवसांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. खाजगी कंपन्यांच्या महागड्या प्लान्सच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे.