Bike Mileage : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या इलेक्ट्रिक वाहनाची क्रीज भारतात वाढताना दिसत आहे परंतु देशात पेट्रोलच्या स्कूटर आणि मोटरसायकलच्या विक्री सुद्धा प्रचंड वाढ होताना दिसत आहे.
मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की ओला कंपनीने नुकतीच इलेक्ट्रिक मोटरसायकल सुद्धा लॉन्च केलेली आहे.आज आपण पेट्रोल चालणाऱ्या मोटरसायकल बघणार आहोत की, ज्या जबरदस्त मायलेज देतात.
Top Bike for Mileage
Hero HF 100 : हिरो कंपनी ही देशातच नाही तर जगात नंबर एकला आहे. या कंपनीची Hero HF 100 चा खप जास्त आहे. सदरील मोटरसायकल जवळपास 70 किलोमीटरचे मायलेज देते.
बाईकमध्ये ९७ सीसीचे एअर कुल्ड ४ स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलेले आहे. किंमतही ५९ हजार रुपयांपासून सुरु होते.
TVS Sport : टीव्हीएसची स्पोर्ट ही बाईकही जास्त मायलेजसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. सिलिंडर ४ स्ट्रोक फ्युअल इंजेक्शन इंजिन यात आहे.किंमतही ५९ हजारांपासून सुरु होते.
Bajaj CT 100 : बजाज CT 100 ही बाईकदेखील सर्वाधिक मायलेजसाठी प्रसिद्ध आहे सदरील मोटरसायकल जवळपास 70 किलोमीटरचे एव्हरेज देते. ११.५ लीटरची टाकी देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 70 हजार 176 रुपयांपासून सुरु होते.
Honda CD 110 Dream Deluxe : होंडा कंपनीदेखील यामध्ये अग्रेसर आहे. होंडा सीडी ११० ड्रीम डीलक्स ही बाईकही ७० च्या मायलेजसाठी ओळखली जाते. 9.1 लीटर पेट्रोलची टाकी यात दिलेली आहे. या बाईकची किंमत 74 हजार 401 रुपयांपासून सुरु होते
TVS : टीव्हीएसची आणखी एक बाईक चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. सदरील बाईकमध्ये 124.8 सीसी इंजिन असून कमी उंचीच्या लोकांसाठी ही बाईक प्रसिद्ध आहे. जवळपास ६० किमी प्रति लीटरचे मायलेज देते.