Aswashit Pragati Yojana : आता ‘या’ दोन संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदे एकत्रित करुन तयार होणार नवीन संवर्ग ! आश्वासित प्रगती योजनापण होणार लागू ..

Aswashit Pragati Yojana : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान “ग्रामपंचायत अधिकारी” असे करण्यात येत आहे. 

ग्रामपंचायत अधिकारी महाराष्ट्र

सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तद्नंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असणाऱ्या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहे. 

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.

संबंधित शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.४९५/२०२४/व्यय-१५,दि.२६.७.२०२४ अन्वये प्राप्त अभिप्राय व त्यानुषंगाने दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मा.मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे.

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत खालील लाभ मिळणार आहेत.

  • १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४ (३८६००-१२२८००), 
  • २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गट विकास अधिकारी एस-१५ (४१८००-१३२३००)
  • ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस -२० (५६१००-१७७५००) असा अनुज्ञेय राहणार आहे.

ग्रामपंचायत अधिकारी या पदांच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय होतील. सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात येईल.

तद्नंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करुन अदा करण्यात यावेत.

सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करण्यात येईल.

सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment

error: Don't Copy!!