Arrears Bills : आता या कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करणे संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित …

Arrears Bills : श्री.शरद गोसावी शिक्षण संचालक,प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून – श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना सदरील विषयास अनुसरुन शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देवके ऑनलाईन सादर

करण्याकरिता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.

Employee Arrears Bills Update

शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पध्दतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून, त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करावी लागणार आहे.सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेणेबाबत यापूर्वीच कळविण्यात आलेले आहे.

सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही.

थकीत वेतन देयक टॅब

शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत राज्यातील काही वेतनपथक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे.

उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके ऑनलॉईन सादर करण्यासाठी दिनांक ५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तदनंतर सन २०२४-२५ वा आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. अशी सूचना देण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  State Employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संवर्गाच्या पदनामात बदल ! वेतनश्रेणीबाबत घेण्यात आला मोठा बदल ...

Leave a comment

error: Don't Copy!!