Allowance Hike : महाराष्ट्र राज्यात होमगार्ड संघटनेची स्थापना दिनांक ६ डिसेंबर,१९४६ रोजी झाली आहे.सदर संघटनेत स्वतःचा व्यवसाय व नोकरी सांभाळून स्वयंस्फुर्तीने देशसेवा करण्याच्या उद्देशाने नागरीकांची मानसेवी स्वरुपात होमगार्ड स्वयंसेवक म्हणून भरती करुन घेण्यात येते.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक / मानवनिर्मित आपत्तींमध्ये पोलीसांना सहाय्य करणे, तसेच संप काळात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास सहाय्य करणे, ही होमगार्ड स्वयंसेवकांची प्रमुख कर्तव्य आहेत.
Homeguard Allowance Hike
होमगार्ड संघटनेचे कार्य/उद्दिष्ट पार पाडण्यासाठी या संघटनेमध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिकासह रोजंदारीवर काम करणारे कामगार तथा मोलमजूरी करणारे नागरिक इत्यादींची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत.
आपल्याला माहीत आहे की,राष्ट्रीय सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित होऊन होमगार्ड संघटनेत स्वयंसेवक म्हणून सामील झालेले आहेत.
स्वयंसेवक मानसेवी असल्याने त्यांच्या कर्तव्यापोटी त्यांना मानधन दिले जाते.त्यांच्याकडून होणारे मोलाचे कार्य विचारात घेऊन, होमगार्ड स्वयंसेवकांना देण्यात येणाऱ्या विविध भत्त्यांच्या दरात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.
होमगार्ड स्वयंसेवक मानधन वाढ
राज्यातील होमगार्ड दलातील स्वयंसेवकांच्या विविध भत्त्यांत वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर दि. ३०.०९.२०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, होमगार्ड दलातील स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या विविध भत्त्यात वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.सदरील भत्तेवाढ दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू करण्यात येत आहे.
सदरहू सुधारित भत्ते लागू करण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता रु.५५२.७१२० कोटी इतकी अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास व त्यानंतर दरवर्षी रुपये ७९५.७१२० कोटी रकमेची तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.