Airtel FD Scheme : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती आहे की,आजकालच्या जमान्यात सुरक्षित गुंतवणूक हा मोठा धोकेदुखीचा विषय बनला आहे.
सध्या अनेक लोक Bank FD हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणतात.सेवानिवृत्त कर्मचारी फिक्स डिपॉझिट च्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागवतात.
आता भारती एअरटेल फायनान्सने सुध्दा एक नवा फिक्स्ड डिपॉझिट प्लॅन सुरू केला आहे.जाणून घेऊया सविस्तर.
Airtel Fixed Deposit Scheme
मित्रांनो,सध्या LIC त्याचबरोबर SIP,Mutual Funds, Post office Investment त्याचबरोबर Bank FD हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानला जातात. दरम्यान भारतीय एअरटेल कंपनीने एक नवीन “फिक्स डिपॉझिट मार्केट प्लेस” सुरू केली आहे.
Airtel thanks app च्या माध्यमातून खाते उघडता येणार आहे.सध्या केवळ अँड्रॉईड डिव्हाईसवर मिळत आहे. लवकरच याचा वापर iOS वरही करता येईल.
फिक्स्ड डिपॉझिटसाठी पार्टनरशीप
स्टेट्स फायनान्स या सेवेसाठी स्मॉल फायनान्स बँक अँड नॉन बँकिंग फायनान्स कंपनीची भागीदारी केलेली असून यामध्ये उत्कर्ष स्मॉल बँक शिवालिक बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि श्रीराम फायनान्स यांचा समावेश आहे.
ग्राहकांनी पैसे गुंतवल्यानंतर ७ दिवसाच्या कालावधी पूर्ण झाल्यावर केव्हाही एफडी मधून पैसे काढता येणार आहे.
एफडी कशी सुरू करायची ?
- सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर एअरटेल थँक्स ॲप इन्स्टॉल करा.
- ॲप मधील फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेसला भेट द्या.
- आपली सर्व माहिती भरा आणि नो योर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करा, जी गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
- १००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम निवडून आपल्या सध्याच्या बँक खात्यातून पैसे भरा.यासाठी तुम्हाला नवीन बँक खात्याची गरज नाही.
- आपल्याला जवळपास ९.१% पर्यंत व्याजदर मिळू शकतो.