Credit score : क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? आपला क्रेडिट रिपोर्ट कसा तयार होतो; कसा वाढवावा आपला सिबिल? पहा सविस्तर

Credit score : वित्तीय संस्थेकडून किंवा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम विचार केला जातो, तो आपल्या क्रेडिट स्कोअर चा. आता हा क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ? क्रेडिट स्कोअर चा वापर बँका कशा करतात ? क्रेडिट स्कोअर तयार कसा होतो आणि क्रेडिट स्कोअर तयार करणाऱ्या भारतातील संस्था कोणत्या ? याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. 

क्रेडिट स्कोअर म्हणजे तुमच्या कर्ज परतफेड करण्याचा इतिहास होय. सदरिल स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. 900 हा सर्वोत्तम असतो तर 500 पेक्षा कमी सिबिल स्कोअर तुमच्या आर्थिक अस्थिरतेची कल्पना देतो. चांगला रिपोर्ट तुम्हाला कर्ज मिळवण्यास मदत करू शकतो.

How is the CIBIL score calculate?

Credit card used : तुमचे सध्याचे कर्जाचे प्रमाण तुमच्या ऐपतीप्रमाणे असावे आपण जर पगाराच्या तुलनेत अधिक लोन घेतलेले असेल तर याचा मोठा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोर वरती होत असतो साधारणपणे क्रेडिट स्कोर च्या अहवालावर याचा 30 % परिणाम होत असतो.

आपण जर क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि क्रेडिट कार्डची मर्यादा असलेल्या रकमेपेक्षा निश्चित कमी रक्कम वापरावी जेणेकरून याचा चांगला परिणाम आपल्या क्रेडिट इतिहासावर होत असतो.तुमच्या क्रेडिट कार्डचे बील दर महिन्याला पुर्ण न करणे,यामुळे स्कोअरची वाढ निःसंशयपणे होत नाही.

Loan repayment :- तुमच्या क्रेडिट स्कोअरवर याचा 35% परिणाम होतो. तुम्हाला कर्ज कसे मिळाले ?त्याचबरोबर EMI वेळेवर न भरणे आणि कर्जाची परतफेड न केल्याने क्रेडिट स्कोअर खूप कमी होऊ शकतो.

Types and tenure of loan :- आपल्या कडील कर्जाचा प्रकार आणि परतफेड याचा आपल्या क्रेडिट स्कोअर वर परिणाम करतो. आपल्या सिबीलवर याचा 10 % परिणाम होतो. एका प्रकारचे कर्ज घेतले असल्यास तुमच्या सिबिल स्कोअर वाढण्यास मदत करणार नाही आणि क्रेडिट कार्डचा वापर पूर्णपणे टाळला तरी सुध्दा क्रेडिट वाढण्यास मदत करत नाही. चांगल्यासाठी स्कोरवर याचा 10% परिणाम होतो.

loan demand and inquiry : अनेक वेळा आपण नकळत कर्जाची चौकशी करत असतो अशावेळी आपण सिव्हिल करोड चेक करताना कर्ज रक्कम टाकतो आणि आपल्या सिबिल हिस्टरी मध्ये याची नोंदवते आणि याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर होत असतो. त्यामुळे,एकामागोमाग अनेक कर्ज चौकशी केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर स्कोअर खराब होऊ शकतो.

Credit Score Bureau in India

क्रेडिट स्कोर व्हिडिओ एक अशी संस्था आहे जो प्रत्येक ग्राहकांचा क्रेडिट डाटा एकत्रित करून विश्लेषण करते. आपला सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर प्रकाशित करते. यामध्ये आपल्या क्रेडिट कार्ड घेतलेले कर्ज इत्यादी कर्जांचा समावेश असतो. त्याचबरोबर आपण इतरांना जामीनदार झालेला असाल , तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला क्रेडिट हिस्टरी मध्ये पाहायला मिळते.

TransUnion CIBIL Limited

सिबिल ही भारतातील पहिली क्रेडिट माहिती कंपनी आहे.सिबिल ब्युरो प्रत्येक व्यक्तीच्या कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी क्रेडिट स्कोअरची माहिती एकत्र करते आणि ठेवते आणि क्रेडिट स्कोअर रँकिंग आणि क्रेडिट माहिती अहवाल तयार करते. सिबिल दस्तऐवज आणि ऑनलाइन CIBIL Score कर्जदारांना कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यास मदत करतात.

Experian Credit Information

एक्सपेरिअन हे डब्लिनवर आधारित पूर्णपणे क्रेडिट स्कोअर ब्युरो आहे. क्रेडिट स्कोअर फाईल तयार करण्यासाठी विशेष तंत्रांचा वापर करते. सदरिल Credit ratings चाचणी भारतातील सभासद बँका आणि विविध आर्थिक आस्थापनांकडून एकत्रित केलेल्या व्यक्तीचे तारण आणि क्रेडिट स्कोअर रेकॉर्ड प्रसिद्ध करते.

Equifax Credit Information

अमेरिकेतील सर्वात जुन्या क्रेडिट स्कोअर ब्युरोपैकी एक कंपनी आहे. Equifax संस्था वैयक्तिक आणि व्यवसायांसाठी क्रेडिट स्कोअर रेटिंग आणि credit पुनरावलोकने काम करते.क्रेडिट स्कोअर रेटिंग आणि क्रेडिट स्कोअर पुनरावलोकन तयार करण्यासाठी कंपनी भारताच्या आर्थिक आस्थापनांशी संबंध ठेवते.

CRIF High Mark

क्रिफ हाय मार्क ही क्रेडिट स्कोअर ब्युरो स्कोअरिंग ॲनालिटिक्स आणि क्रेडिट स्कोअर कंट्रोल सोल्यूशन्समध्ये प्रसिद्ध आहे. बँक,एनबीएफसी,आयकर विभाग इत्यादींकडील रेकॉर्ड विन क्रेडिट स्कोअर मूल्यांकन बनवते.ऑनलाइन क्रेडिट स्टोअर साठी CRIF High Mark शुल्क आकारणी करते.

1 thought on “Credit score : क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? आपला क्रेडिट रिपोर्ट कसा तयार होतो; कसा वाढवावा आपला सिबिल? पहा सविस्तर”

Leave a Comment

error: Don't Copy!!