Bank loan : बापरे.. आपल्याला बॅंकेकडून मिळते तब्बल 10 प्रकारचे लोन! पहा संपूर्ण यादी

Bank Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये आपल्याला सर्वतोपरी मदत करणारे महत्त्वाची आणि खात्रीशीर संस्था म्हणजे बँक या बँक कडून आपल्याला वेळोवेळी आर्थिक अडचणीत कर्ज स्वरूपात मदत होत असते.

बँकांकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज उपलब्ध होत असते परंतु आपल्याला थोड्याच प्रकारच्या कर्जांची माहिती असते. मित्रांनो बँकेत आपल्याला अशा प्रकारची कर्ज मिळू शकते, याचा विचार आपण आतापर्यंत केलेला नसेल. आता आज आपण तुमच्या गरजा सहज भागू शकते अशा कर्जाची माहिती या लेखांमध्ये सविस्तर बघणार आहोत.

Types of Bank loan

बँकेकडून आपल्याला मिळणाऱ्या विविध कर्जाची माहिती तसेच प्रकार आपण खालील प्रमाणे पाहुयात

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) : हे कर्ज कुठल्याही उद्देशासाठी वापरता येते. बँकेकडून मिळणाऱ्या कर्जातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तुम्ही कुठंही करू शकता तुमची मिळकत आणि क्रेडिट स्कोअर तपासून हे कर्ज दिले जाते.

व्यवसाय कर्ज (Business Loan) : एखादा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी हे कर्ज दिले जाते. यासाठी बँकेकडे काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित असते.

सॅलरी ॲडवांस कर्ज (Salary Advance Loan) : बँकेकडून ग्राहकांसाठी सॅलरी ॲडवांस लोनही ग्राहकांना दिले जाते. यामध्ये पगाराचे पैसे आगाऊ मिळतात. अडचणीच्या वेळी बँकेची ही सुविधा मदतीची ठरते.

शैक्षणिक कर्ज (Education Loan) : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीसुद्धा बँकेकडून कर्ज दिले जाते. शालेय,महाविद्यालयीन शिक्षण खर्च, व्यवसाय शिक्षण,परदेशातील शिक्षण असे खर्च समाविष्ट असतात.

सोने तारण कर्ज (Gold Loan) : आपणास माहित असलेले हे कर्ज असून बँकेकडून सोने तारण ठेवून ग्राहकांना गोल्ड लोन दिले जाते.आपण सोने तारण ठेवून बँकेकडून कर्जाऊ पैसे घेऊ शकता. सोने तारण कर्ज हे बाजारभावाच्या 70 % मिळते.

कोलॅटरल लोन (Collateral Loan) : आपल्या मालमत्तेचा काही भाग,FD किंवा सोने गहाण ठेवून तुम्हाला हे कर्ज घेता येते.

मेडिकल लोन (Medical Loan) : दवाखान्यातील खर्चापासून ते आजारपणावरील उपचारांपर्यंतचा खर्च या कर्जातून करता येतो. वैद्यकिय कारणांसाठी सदरील मेडिकल लोन बँक देते.

Bank loan lists

वेडिंग लोन (Wedding Loan) : आपल्याला नवल वाटेल, लग्नाचा खर्च करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैशांची चणचण भासतेय, तर अशा वेळी बँक तुम्हाला कर्ज देते. कर्जाच्या पैशांतून आपण वेन्यू बुकिंग, कॅटरिंग, डेकोरेशन असे खर्च करु शकता.

रेनोवेशन लोन (Renovation Loan) : आपल्या घराची,कार्यालयाची दुरुस्ती किंवा अशा इतर कामांसाठीही बँकेकडून कर्ज घेता येते.

शॉर्ट टर्म लोन (Short Term Loan) : बँकेकडून दिल्या जाणाऱ्य़ा या सवलतीमध्ये तुम्हाला अचानक ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी मदत होते. या कर्जांवर व्याजदर जास्त असतो. त्यामुळे हे एक अनसिक्योर्ड पर्सनल लोन आहे.

ट्रॅव्हल लोन (Travel Loan) : आपल्याला आश्चर्य वाटेल,आपल्याला फिरायला जाण्यासाठी सुध्दा बँक कर्ज देते.आपण जर कुठे फिरण्याचा बेत आखत असाल तर बँक आपल्याला ट्रॅवल लोन देऊ करते. या पैशांतून तुमचा फ्लाईट खर्च, व्हिसा, वास्तव्याचा खर्च भागवू शकता.

Leave a Comment

error: Don't Copy!!