Sakal scholarship : सकाळ इंडिया फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्याला १लाख शिष्यवृत्ती; पहा पात्रता व लगेच करा अर्ज

Sakal scholarship : सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा PG diploma करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

सदरील शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा? शिक्षण, वय, फी, अधिकृत संकेतस्थळ, अर्ज ऑनलाईन संकेतस्थळ ही सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Sakal India foundation abroad scholership

सकाळ इंडिया फाउंडेशनकडून परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते.शिष्यवृत्ती भारतात किंवा परदेशात पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठीही दिली जाते.

स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर आणि भविष्यातील संभाव्य कमाई क्षमतेच्या आधारे रक्कम दिली जाते. सकाळ इंडिया फाउंडेशनकडून कर्ज शिष्यवृत्तीवर कोणतेही व्याज आकारण्यात येत नाही.

सकाळ फाउंडेशन स्कॉलरशिप पात्रता व निकष

विद्यार्यांना परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा तसेच भारतात किंवा परदेशात PHD शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले भारतीय विद्यार्थी सकाळ इंडिया फाऊंडेशनच्या या व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

  • शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया :- ऑनलाइन अर्ज आणि मुलाखत
  • शिष्यवृत्तीची रक्कम: – ₹ 1,00,000/- (एक लाख रुपये)
  • शिष्यवृत्तीचा कालावधी – 2 वर्षे
  • पात्र अभ्यासक्रम :- परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा, भारतात किंवा परदेशात पीएचडी.

सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्रे

  • छायाचित्रांसह ऑनलाइन अर्ज
  • इयत्ता 10वी/12वी गुणपत्रिका आणि मागील शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि मार्कशीट्स
  • अभ्यासक्रमाच्या खर्चाचे विवरण
  • विद्यार्थी आणि पालक यांचे आधार आणि पॅन कार्ड.
  • संपर्क तपशील – पत्ता- सकाळ ऑफिस बिल्डिंग, 595, बुधवार पेठ, पुणे 411002
  • फोन: 020 66035935
  • ईमेल: contactus@sakalindiafoundation.org
  • ऑनलाइन अर्जासाठी लिंक:- https://www.sakalindiafoundation.com

Leave a Comment

error: Don't Copy!!