Aadhaar Voter ID Link : आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग संदर्भात केंद्र सरकारकडून मोठी अपडेट; आता …

Aadhaar Voter ID : Link : एकीकडे आधार मोफत अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.

Aadhaar Card Link Voter ID

केंद्र सरकारने आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतंही टार्गेट किंवा मुदत अद्याप ठेवण्यात आलेली नाही.

कायदा मंत्री मेघवाल यांनी दिली माहिती

कायदा मंत्री मेघवाल यांनी सांगितलं की, भारताच्या निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, EPIC शी आधार लिंक करणे अद्याप सुरू झालेले नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे.

मतदान आधार लिंक अपडेट्स

धोडक्यात आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे अद्याप ऐच्छिक आहे. मतदारांना त्यांचे मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची गरज नाही.

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे मतदारांची ओळख पटवणे सोपे होईल आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन रोखता येईल.

Voter ID aadhaar link process

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकता:

ऑनलाईन :- आपण NVSP पोर्टलवर (www.nvsp.in) जा आणि मतदार यादीवर क्लिक करा. तुमचे मतदार कार्ड तपशील किंवा EPIC क्रमांक आणि तुमचे राज्य सांगा. वेबसाइटच्या उजव्या बाजूला फीड आधार क्रमांकावर क्लिक करा. आधार कार्डचा तपशील एंटर केल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल. तुम्ही ओटीपी टाकताच, तुमच्या स्क्रीनवर आधार आणि मतदार ओळखपत्र लिंकिंगवर एक सूचना दिसेल.

ऑफलाइन : तुमच्या जवळच्या मतदान केंद्रावर जा आणि आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंगसाठी अर्ज करा.

आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंगचे फायदे

  • मतदारांची ओळख पटवणे सोपे होईल.
  • मतदार यादीतील डुप्लिकेशन रोखता येईल.
  • मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे ऐच्छिक आहे. मात्र, यामुळे मतदारांना अनेक फायदे होतील. त्यामुळे तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे असे मानत असाल तर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकता.

Leave a Comment

error: Don't Copy!!