PF KYC Account : नमस्कार मित्रांनो,आपण जर आपल्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ खात्याला जर केवायसी केले नसेल तर पैसे काढण्यास अडचण येते. अशावेळी काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो,बऱ्याच कर्मचाऱ्यांना पीएफचा पैसा काढायचा आहे, पण त्यांची KYC पूर्ण झालेली नाही. त्यामुळे PF Amount काढण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. पीएफला केवायसी अपडेट कसे करायचे (Provident Fund KYC Account) असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याची माहिती आपण 10 स्टेप्समध्ये जाणून घेणार आहोत.
PF KYC Update Online Process
- सर्व प्रथम सर्च ब्राऊझरवर Login Epfo असे सर्च करायचे आहे.
- आता Employee Provident Fund ची https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- आपल्यासमोर समोर असलेल्या होम पेजवर KYC Updation (Member) यावर क्लिकवर करावे.
- UAN नंबर आणि पासवर्ड टाकून Captcha कोड टाकून साईन इन करून घ्यावे.
- साईन इन केल्यावर आपला मोबाईल नंबरवर आलेला OTP इथे टाकावा.
- आता एक पेज आले असेल त्यात आपली माहिती समोर दिसली असेल. आता तुम्हाला मॅनेज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर KYC चे ऑप्शन आले असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल.
- तुम्हाला नेमकी kyc कशाची करायची आहे. जसे की, बँक अकाऊंट, पॅन कार्ड, पासपोर्ट हे सिलेक्ट करावे. आपल्याला बँक खात्याची KYC करायची असल्याने बँक निवडा.
- आता एक नवीन फॉर्म ओपन झाला असेल. त्यावर तुम्हाला तुमचे नाव दिसेल याठिकाणी जो बँक अकाऊंट PF खात्याला केवायसी करायचा आहे तो नंबर टाकून IFSC कोड भरावा आणि टर्म ॲण्ड कंडिशनला ok करून save करावा.
- शेवटी आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमाकांवर एक OTP येईल. तो इथे भरा आणि सबमिट करावा.
अशा प्रकारे तुमच्या PF Account KYC झालेली असेल.