Close Visit Mhshetkari

ITR filing 2025 : आता 2 मिनिटांत डाउनलोड होईल फॉर्म 16, पहा सोपी प्रोसेस; जाणून घ्या एका क्लिकवर

ITR filing 2025 : आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR दाखल करण्यासाठी फॉर्म-16 आवश्यक असतो. खाजगी कंपन्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करतात पण, असे बरेच लोक आहेत, जे पहिल्यांदाच त्यांचे आयकर रिटर्न भरणार आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 बद्दल कमी माहिती असते.

ITR Filing Form 16 Download

नोकरदार मध्यमवर्गाला दरवर्षी आयकर विवरणपत्र म्हणजे ITR फाईल करण्यासाठी फॉर्म 16 आवश्यक असतो. मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, कंपनी साधारणपणे जून महिन्यात कर्मचाऱ्यांचा 16 नंबर फॉर्म जारी करत असतात.ज्यामध्ये व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाची व आयकर संदर्भात सविस्तर माहिती दिलेली असते.

विविध उद्योग व्यवसाय कर्ज प्रकरणासाठी आपल्याला या इन्कम टॅक्स फॉर्म नंबर 16 ची गरज असते. खाजगी क्षेत्रातील कंपन्या नियमितपणे कर्मचाऱ्यांच्या टॅक्स भरत असली तरी, हा फॉर्म देण्यासाठी जर आपण नोकरी सोडली तर आपल्याला हा फॉर्म मिळण्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

आता हा फॉर्म नंबर 16 कसा डाउनलोड करायचा ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. आपल्याला आपली ITR file करायचा असेल तर तुम्ही स्वतः काही मिनिटांत हा फॉर्म डाउनलोड करू शकता.

फॉर्म 16 मध्ये कोणकोणती माहिती असते ?

  • पगाराद्वारे मिळवलेले उत्पन्न
  • स्रोतावर कर वजावट (TDS)
  • विविध कलमांखाली दावा केलेल्या सूट

फॉर्म 16 चे मुख्यत्वे दोन भाग – भाग अ आणि भाग बी – असतात.

Part A : फॉर्म 16 च्या भाग अ मध्ये तिमाही टीडीएसची माहिती असते.

  • नियोक्ता आणि कर्मचाऱ्याचे नाव आणि पत्ता
  • नियोक्त्याचा पॅन (कायमस्वरूपी खाते क्रमांक) आणि टॅन
  • कर्मचाऱ्याचा पॅन
  • नियोक्त्याने पगारावर कर मोजण्याचा कालावधी

कर्मचाऱ्याच्या संदर्भात नमूद केल्याप्रमाणे पगार आणि स्रोतावर कर वजावट (TDS) म्हणून भरलेल्या किंवा जमा केलेल्या रकमेचा सारांश असतो.

हे पण वाचा ~  Income Tax Rules : आयकर दातांसाठी महत्त्वाची बातमी ! आता 1एप्रिल 2025 पासून होणार हे महत्त्वाचे बदल....

Part B : कर्मचाऱ्याला दिलेले किंवा जमा केलेल्या पगाराची माहिती, तसेच कर्मचाऱ्याने निवडलेल्या उत्पन्न कर प्रणालीचा उल्लेख – जुना किंवा नवीन

  • एकूण पगाराचे तपशीलवार विभाजन
  • कलम 17(1) मधील तरतुदीनुसार पगार
  • कलम 17(2) मधील लाभांचे मूल्य
  • कलम 17(3) मधील पगाराऐवजी नफा
  • कलम 10 अंतर्गत आयकरातून सूट मिळालेले भत्ते
  • पगारदार कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या मानक वजावटीसारख्या इतर कोणत्याही वजावटी
  • आयकर कायद्याच्या अध्याय VI-A अंतर्गत परवानगी असलेल्या वजावटी जसे की कलम 80सी, 80ड, इत्यादी.
  • असेल तर कलम 89 अंतर्गत सवलत

फॉर्म 16 कसा डाउनलोड करायचा?

फॉर्म 16 TRACES (TDS Reconciliation Analysis and Correction Enabling System) वेबसाइटवरून किंवा तुमच्या नियोक्त्याच्या पोर्टलवरून मिळू शकतो.

  • सर्वप्रथम TRACES च्या contents.tdscpc.gov.in या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन लॉगिन करा किंवा नोंदणी करावी.
  • तुमचा पॅन वापरकर्ता आयडी म्हणून वापरावे.नवीन असल्यास नोंदणी पूर्ण करा
  • ‘डाउनलोड्स’ टॅब अंतर्गत ‘फॉर्म 16’ निवडा
  • फॉर्म 16 प्रकार (भाग A किंवा B) आणि संबंधित आर्थिक वर्ष निवडावे.
  • शेवटी पॅन आणि इतर आवश्यक माहितीची खात्री करून विनंती सबमिट करा.
  • TDS तपशील (पावती क्रमांक, तारीख, रक्कम) प्रविष्ट करा आणि सबमिट करावे.
  • फॉर्म 16 उपलब्ध झाल्यावर ‘डाउनलोड’ विभागातून प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.

कर्मचारी पोर्टल

  • तुमच्या कंपनीच्या कर्मचारी पोर्टलमध्ये प्रवेश करा.
  • कर विभाग शोधा आणि निवडा.
  • उपलब्ध पर्यायांमधून फॉर्म 16 शोधा आणि डाउनलोड करा.
  • तपशील सत्यापित करा. डाउनलोड करण्यापूर्वी सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करा.

आपण अशाप्रकारे आपण फॉर्म नंबर 16 सहजपणे मिळवता येतो.आपल्याला अचूक व वेळेवर आयकर रिटर्न भरण्यासाठी याचा वापर करता येतो. मित्रांनो फॉर्म 16 आयकर नियमांचे पालन सुनिश्चित करते. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या उत्पन्नाबाबत आणि कर कपातीबाबत सविस्तर माहिती यामध्ये मिळत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!