Employees DA Hike : केंद्र सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) २ % नी वाढ केली आहे.१ जानेवारी २०२५ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५३% वरून ५५% झाला आहे. केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत, आता उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २% ची वाढ केली आहे.
Employees DA Hike 2025
महागाई भत्ता वाढीमुळे आता यूपी सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ५३% वरून ५५% झाला आहे.नवीन दर १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहेत.राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या ३ महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे.
सदरील डीए वाढीमुळे पगार एप्रिल २०२५ च्या पगारासोबत मे २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
महागाई भत्त्यामुळे सरकारवर मे २०२५ मध्ये १०७ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल, तर थकबाकीच्या पेमेंटमुळे १९३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. जुनी पेन्शन योजना (OPS) असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीपीएफ खात्यात १२९ कोटी रुपये जमा होतील.जून २०२५ पासून सरकारला दरमहा १०७ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे.
महागाई भत्ता वाढ 2025
DA Hike मुळे राज्यातील सरकारी कर्मचारी, अनुदानित शिक्षण/तंत्रशिक्षण संस्थांमधील नियमित आणि पूर्णवेळ कर्मचारी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, कार्यभारित कर्मचारी आणि यूजीसी वेतनश्रेणीतील सुमारे १६ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
महागाई भत्त्याची गणना
महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये वाढ औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या १२ महिन्यांच्या सरासरीतील वाढीच्या आधारावर केली जाते. सरकार साधारणपणे दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी या भत्त्यांमध्ये सुधारणा करते.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए सूत्र
DA% = [(\text{मागील १२ महिन्यांसाठी AICPI (आधार वर्ष २००१ = १००) चा सरासरी} – ११५.७६)/११५.७६] \times १००
सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी डीए सूत्र
DA\% = [(\text{मागील ३ महिन्यांसाठी AICPI (आधार वर्ष २००१ = १००) चा सरासरी} – १२६.३३)/१२६.३३] \times १००
लाखों कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! डीए वाढवला, ३ महिन्यांची थकबाकीही मिळणार; वित्त विभागाचा आदेश जारी, मे मध्ये खात्यात वाढीव पगार जमा होणार आहे.
आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केव्हा वाढ होते याकडे राज्य कर्मचाऱ्यांची लक्ष लागून राहिले आहे. अक्षय तृतीयेच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई महागाई भत्ता वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.