Close Visit Mhshetkari

Personal Loan : पर्सनल लोन घेतलाय काय? कर्ज घेण्यापूर्वी पहा काय असतात अटी,कागदपत्र,छुपे चार्ज आणि नियम

Personal Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल आजकाल छोटे-मोठे कोणतीही काम करायचे असल्यास आपल्याला पैशाची अडचण भासत मित्रांनो आरोग्य शैक्षणिक किंवा घर बांधकाम यासाठी आपल्याला बँकेकडून वेळोवेळी पर्सनल लोन घ्यावे लागते.

बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) सहज उपलब्ध करून देत असलेले हे कर्ज सुरक्षित नसते, म्हणजेच यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज भासत नाही.जलद निधी मिळवण्यासाठी हा एक लोकप्रिय पर्याय ठरतो.

बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) सहज उपलब्ध करून देत असलेले हे कर्ज सुरक्षित नसते, म्हणजेच यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज भासत नाही.जलद निधी मिळवण्यासाठी हा एक लोकप्रिय पर्याय ठरतो.

आता हे पर्सनल लोन घेताना यासाठी कोणते चार्जेस लागतात आवश्यक कागदपत्रे कोणती कर्ज घेताना कोणत्या बाबींचा विचार करावा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Personal Loan Important Tips

  • Principal Amount : बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून तुम्ही घेतलेली खरी रक्कम. ही कर्जाची मूळ किंमत असते.
  • Loan Tenure : तुम्ही हे कर्ज किती महिन्यांमध्ये परत करणार आहात, याचा तो निश्चित वेळ असतो. साधारणपणे हा काळ १२ महिन्यांपासून ते ६० महिन्यांपर्यंत असू शकतो.
  • Interest Rate : तुम्ही घेतलेल्या मुद्दलावर बँक किंवा वित्तीय संस्था जी अतिरिक्त रक्कम आकारते, ती टक्केवारी म्हणजे व्याज दर होय. सदरील दर निश्चित (Fixed) किंवा बदलणारे (Floating) असू शकतात.
  • EMI – Equated Monthly Installment : दर महिन्याला तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी जी ठराविक रक्कम भरता, तिला ईएमआय म्हणतात. यात तुमच्या मुद्दलाचा काही भाग आणि व्याजाचा समावेश असतो.
  • Processing Fee : तुमचा कर्जाचा अर्ज स्वीकारून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्था एकदाच (One-time) शुल्क आकारते.
  • Prepayment/Foreclosure Charges : कर्जाचा ठरलेला कालावधी पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही संपूर्ण कर्ज परत करण्याचा निर्णय घेतला, तर काही संस्था शुल्क आकारू शकतात.
  • APR – Annual Percentage Rate : वार्षिक टक्केवारी दर कर्जाचा खराखुरा वार्षिक खर्च दर्शवतो. यात व्याजदरासोबत इतर शुल्कांचाही समावेश असतो, ज्यामुळे कर्जाची एकूण किंमत समजायला मदत होते.

वैयक्तिक कर्ज पात्रता

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थेचे काही नियम आणि अटी पूर्ण कराव्या लागतात. जरी प्रत्येक संस्थेचे नियम थोडे वेगळे असू शकतात, तरी काही प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.

हे पण वाचा ~  HRA Calculator : आनंदाची बातमी .... महागाई भत्त्याबरोबर घर भाडे भत्त्यात होणार वाढ ! पहा HRA कॅल्क्युलेटर ...

1) वयाची अट : अर्जदाराचे वय साधारणपणे २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे लागते.

2) Annual Income : तुमच्याकडे उत्पन्नाचा स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही ईएमआय नियमितपणे भरू शकाल. पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती अर्ज करू शकतात.

3) Credit History : तुमचा पूर्वीचा कर्जाचा आणि आर्थिक व्यवहारांचा रेकॉर्ड चांगला असणे महत्त्वाचे आहे. चांगला क्रेडिट स्कोअर, साधारणपणे ७५० पेक्षा जास्त असल्यास, कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

Personal loan  Require Documents

अ ) : आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक.

ब) पत्ता पुरावा : युटिलिटी बिल (वीज बिल, पाणी बिल), भाडे करार किंवा मतदार ओळखपत्र.

क) उत्पन्नाचा पुरावा : पगारदारांसाठी मागील काही महिन्यांच्या पगार स्लिप आणि बँक स्टेटमेंट, तर स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी बँक स्टेटमेंट आणि आयकर रिटर्न (ITR)

Personal loan Hidden Charges

वैयक्तिक कर्जाचा व्याजदर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसे की कर्ज देणारी संस्था आणि तुमचा क्रेडिट प्रोफाइल.अनेक बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) आकर्षक व्याजदर देऊ शकतात. मात्र, कर्जाशी संबंधित इतर शुल्क समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागणार नाही.

  • प्रक्रिया शुल्क : हे कर्जाच्या रकमेच्या १ ते ३% पर्यंत असू शकते.
  • विलंब शुल्क (Late Payment Charges) : जर तुम्ही तुमचा ईएमआय वेळेवर भरला नाही, तर बँक दंड आकारू शकते.
  • प्रीपेमेंट शुल्क : जर तुम्ही मुदतीपूर्वी कर्ज परत केले, तर काही संस्था यावर शुल्क लावू शकतात.
  • क्रेडिट स्कोअर : तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा
  • तुमचा क्रेडिट स्कोअर तुमची कर्ज मिळवण्याची क्षमता आणि त्यावर मिळणारे व्याजदर ठरवतो. उच्च क्रेडिट स्कोअर (७५० किंवा त्याहून अधिक) हे दर्शवते की तुम्ही आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहात. यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात आणि मोठ्या रकमेचे कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

मित्रांनो, वैयक्तिक कर्ज हे आपली गरज भागवण्याचे अत्यंत सोपे आणि सुरक्षित साधना असले ल,तरी कर्ज घेताना आपण योग्य कारणासाठी कर्ज उचलावे खरोखरच गरज असेल तरच या मार्गाचा अवलंब आपण वैयक्तिक कर्ज घेताना, आपला मासिक हप्ताकिती असेल त्याचबरोबर आपले मासिक वेतन किती आहे, त्याचा ताळमेळ नक्की बसवावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!