Agriculture Land : नमस्कार मित्रांनो आपण जर शेतकरी असाल आणि शेतजमिनी संदर्भात व्यवहार करत असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपणास घेऊन आलो आहोत.मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, सरकारने तुकडे म्हणजे काय गेल्यापासून नऊ गुंठ्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री बंद झालेले आहे किंवा त्याचे व्यवहार आपल्याला करता येत नाही.
आपण “NA” हा शब्द नक्कीच ऐकला असेल परंतु या प्रक्रियेला अनेकजण जटिल किंवा गुंतागुंतीची वेळ खूप प्रक्रिया म्हणतात पूर्वी येणे मंजुरीसाठी वेगवेगळ्या शासकीय विभागातून न हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे.
Non-Agricultural Land Conversion Process
शासनाने NA करण्यासंदर्भातील प्रक्रियेमध्ये सुधारणा केली असून आता बिगरशेती म्हणजेच Non-Agricultural Use अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध करता येते.
सामान्यतः जमिनींचा वापर शेतीसाठी केला जातो. परंतु आपण जर आपली जमीन औद्योगिक, वाणिज्यिक किंवा निवासी वापरासाठी बदलायची असेल, तर त्यासाठी अधिकृत परवानगी घेणे गरजेचे असते. शेतीच्या जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला Non-Agricultural Land Conversion असे म्हणतात.
1) व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी – जर कोणाला कारखाना, गोदाम किंवा दुकान उभारायचे असेल, तर जमीन बिगरशेतीत रुपांतर करावी लागते.
2) घर बांधण्यासाठी – वैयक्तिक घर बांधण्यासाठी शेतीची जमीन NA करून निवासी वापरासाठी मिळवावी लागते.
3) विक्रीसाठी अनिवार्य – महाराष्ट्र तुकडेबंदी कायद्याअंतर्गत, ठरावीक क्षेत्रापेक्षा लहान जमिनीचे तुकडे विक्रीसाठी NA मंजुरी आवश्यक असते.
NA साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?
शेतकरी किंवा जमीन मालक तहसीलदार कार्यालयात जाऊन एनए साठी अर्ज करू शकतात.
ऑफलाइन अर्ज : तहसील कार्यालयातून अर्जाचा नमुना घेऊन भरावा. तसेच स्वतंत्र कागदावर आवश्यक माहिती भरून अर्ज दाखल करता येतो.
अकृषिक जमिनीसाठी साठी लागणारी कागदपत्रे
- सातबारा उतारा
- फेरफार नोंद
- मिळकत पत्रिका
- प्रतिज्ञापत्र सीमांकन नकाशा
- जमिनीचा सर्व्हे किंवा गट नंबर नकाशा
- एनए प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 अंतर्गत जमीन बिगरशेतीसाठी म्हणजेच NA प्रमाणपत्र देण्यात येते. शासनाने सदरील कायद्यात येऊन अनेक सुधारणा केल्या आहेत.जसे की, कलम 42 (ब), (क), आणि (ड). आता या सुधारणामुळे Non-Agricultural प्रक्रियेला वेगवान आणि सोपे बनवले आहे.
Non-Agricultural मंजुरी मिळाल्यानंतर काय करावे?
मित्रांनो एकदा जमीन बिगर शेतीसाठी मंजूर झाले की ,संबंधित जमिनीचा वापर ज्या उद्देशासाठी मंजुरी मिळाली आहे त्यासाठी करता येईल. मात्र असे असले तरी NA मिळण्याच्या वेळेस काही अटी दिलेल्या असतात,त्या अटींची पूर्तता करणे आवश्यक असते .जसे की –
ठराविक वेळेत विकास व कामे सुरू करावे.
प्रादेशिक नियोजन विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
स्थानिक नगरपालिकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात.
на Tyeala.
Tyeala, An Uneasy Truce tyeala.com .