Shalarth update : महत्त्वाची बातमी .. “या” कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित; असा करता असा बदल ..

Shalarth Update : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडून संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना खालील कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

Shalarth New Update

माध्यमिक शिक्षण संचालनालय कडून दि.११/०३/२०२५ रोजी शालार्थ API प्राप्त झालेला आहे. सदरील डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती (उदा. मराठीतून नाव, Email ID) अपूर्ण असल्याचे निर्देशास आले आहे. तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर, शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही माहिती शालार्थमध्ये update होणे गरजेचे आहे.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आहे. अशा शिक्षकांची शालार्थ मधील माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती update करणेबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे.

मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन शालार्थ या वेतन प्रणाली द्वारे करण्यात येते. सदरील प्रणालीत अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहितीचा समावेश असतो. जसे की, कर्मचाऱ्याचे नाव, कार्यालयाचा पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी,आधार, भविष्य निर्वाह निधी किंवा एनपीएस खात्याचा क्रमांक, बँक अकाउंट बेसिक त्याचबरोबर वारस इत्यादी. आता सदरील पत्र द्वारे कर्मचाऱ्यांना आपल्या बेसिक माहिती मध्ये बदल करता येणार आहे.

हे पण वाचा ~  Ladaki Bahin Yojana : "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! आता झाला ' हा' बदल ...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!