HSRP Number Plate : दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
HSRP Number Plate new update
आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्व सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी/ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा टैक्सी /बस ट्रक संघटनाची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करण्यात आले आहे.
HSRP म्हणजे काय ?
मित्रांनो, HSRP ही उच्च सुरक्षा असलेली वाहन नोंदणी प्लेट आहे, जी ॲल्युमिनियमपासून बनवलेली असते.
सदरील प्लेटमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्या बनावट करणे कठीण होते.HSRP मध्ये होलोग्राम,लेझर-एच्ड सीरियल नंबर आणि इतर सुरक्षा चिन्हे असतात, ज्यामुळे वाहनाची ओळख सुलभ होते.
HSRP नंबर प्लेट कशी मिळवायची?
1) ऑनलाइन अपॉइंटमेंट : महाराष्ट्र परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी.
2) कागदपत्रे : वाहनाची नोंदणी कागदपत्रे (RC बुक).
वाहन मालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
3) पेमेंट : HSRP प्लेटसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करा.
4) प्लेट बसवणे : नियोजित तारखेला निर्दिष्ट केंद्रावर जाऊन HSRP प्लेट बसवून घ्या.
अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.आपण जवळच्या RTO कार्यालयात संपर्क करू शकता.