SSC HSC Result : दहावी, बारावीच्या परीक्षेचे निकाल कधी लागणार? रिझल्ट संदर्भात मोठी अपडेट समोर..

SSC HSC Result : नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात बारावीच्या परीक्षा संपलेल्या असून दहावीचा एक पेपर शिल्लक आहे. अशातच दहावी बारावीचा निकाल केव्हा लागणार या संदर्भात विद्यार्थी व पालक वर्गाकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

SSC HSC Result update

मित्रांनो राज्यातील बारावीची परीक्षा संपलेला असून दहावीचा एक पेपर 18 मार्च रोजी होणार आहे.दहावी बारावी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी व पालक सुट्ट्यांची नियोजन करून लागलेले असताना,मुलांचा निकाल कधी लागणार याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे;तर आज आपण दहावी बारावीचा निकाल केव्हा लागणार याविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

दररोज तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 11 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. आता बारावीच्या परीक्षा संपलेल्या असून दहावीच्या सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे.त्यानंतर पालकांना जास्त दिवस निकालाची वाट पाहावी लागणार नाही कारण दहावी बारावीचा परीक्षेचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.

हे पण वाचा ~  School Admission : आता मुलांना इयत्ता पहिली टाकण्यासाठी लागणार "एवढे" वय ! शासन परिपत्रक निर्गमित ...

निकाल वेळेत लागणार!

दरम्यान विरारमध्ये शिक्षकेने उत्तर पत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या अशातच घराला लागलेल्या आगीमुळे उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जाळलेला आपण ऐकले असेल,यानंतर बोर्ड कडून कठोर नियम करण्यात आलेले असूआहेत. आता दहावी बारावीचे पेपर शाळेतच तपासण्याच्या सक्त सूचना शिक्षकांना व शालेय प्रशासनांना देण्यात आलेले आहेत.

ज्या विषयाचे पेपर झाले आहेत अशा विषयांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासणी होण्यासाठी दररोज शाळेत उत्तर पत्रिका तपासण्याचे आयोजन करण्यात आले असून दररोज 35 उत्तरपत्रिका तपासण्याचे निर्देश बोर्डाकडून शिक्षक शालेय प्रशासनाला देण्यात आले आहे.

दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने SSC HSC Result निकाल 15 मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती समोर येत आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!