DA Hike Update : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने एक जुलै 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ केली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 53% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मित्रांनो,असे असले तरी राज्य सरकारी कर्मचारी हा महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहे.
DA Hike New Update
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे सुमारे १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या ८ महिन्यांपासून महागाई भत्ताच अदा करण्यात आलेला नाही. सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून प्रलंबित भत्ता अदा न केल्यास कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
राज्य शासकीय,निमशासकीय,नगर परिषद,जिल्हा परिषद अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून सुमारे १७ लाख कर्मचारी आहेत.जुलै २०२४ पासून ३% दराने मिळणारा महागाई भत्ता (DA Hike) अद्याप अदा करण्यात आलेला नाही.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या
- १ जुलै २०२४ पासूनचा ३% दराने प्रलंबित महागाई त्वरित मंजूर करावा.
- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार १ जुलै २०२४ पासून देय असलेल्या घरभाडे भत्त्याची पुनर्रचना करण्यात यावी.
- वेतन त्रुटी दूर करण्यासाठी मुकेश खुल्लर समितीचा अहवाल जाहीर करावा.
- UPS योजनेच्या १ मार्च २०२४ पासूनच्या अंमलबजावणी संदर्भातील अटी, शर्ती, नियम आणि कार्यपद्धती निश्चितीसाठी शासन निर्णय त्वरित जारी करावा.
विविध सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना कडून या मागण्या सरकारकडे मांडण्यात आले आहे.आता सरकार अधिवेशनापूर्वी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य करते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.