NPS DCPS Gratuity : मोठी बातमी… “या” कर्मचाऱ्यांच्या वारसास १० लाख रुपये सानुग्रह अनुदान; शासन निर्णय निर्गमित ….

NPS DCPS Gratuity : वित्त विभागाच्या दि. ३१ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान (Gratuity) तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहेत. 

NPS DCPS Employee Gratuity

सदर आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आले आहेत.मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करण्याच्या सूचना सदर शासन निर्णयान्वये देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरुन या विभागाने शासन निर्णय, दिनांक १४ जून, २०२३ निर्गमित केला आहे.

दि. ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेला कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे, त्या कार्यालयांनी ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्यांचा दोष नसतांना काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे खातेउघडले गेले नसेल, अशा कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस, नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील रु १० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहील.मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल”

हे पण वाचा ~  Gratuity Family Pension : आता या DCPS/NPS कर्मचाऱ्यांना मिळणार सेवानिवृत्ती उपदानसह कुटुंब निवृत्तिवेतन/रुग्णता निवृत्तिवेतन लागू ; पहा सविस्तर ...

“या” कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.२९.०९.२०१८ मधील तरतूदी विचारात घेता,परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली DCPS/NPS योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचान्यांना वित्त विभाग शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ रोजीच्या तरतुदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले. वित्त विभागाच्या दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयास अनुरारुन शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या दि.१४.०६.२०२३ च्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहील, असे अभिप्राय दिले होते.

मित्रांनो,आता दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व DCPS/NPS च्या तरतूदी लागू असलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्याऱ्यांना या सदरील लाभ मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!