School Holidays : चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्यास सुरवात झाली आहे. एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे.शाळांना 1 मेपासून उन्हाळा सुट्टी लागणार आहे. आता 14 जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी असणार आहे.
School Holidays List 2025
मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की आता चालू शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आहे.उन्हाळ्याला देखील सुरुवात झाली असून लवकरच शाळा सकाळ सत्रात भरण्यास सुरुवात होईल.जवळपास एप्रिलच्या १५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे. यावर्षी शाळांना १ मेपासून उन्हाळा सुटी (School Holidays) लागणार आहे. १४ जूनपर्यंत उन्हाळा सुटी असणार असून १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.
शिक्षण विभागाच्या शैक्षणिक नियोजनानुसार राज्यातील प्राथमिक शाळांना जवळपास 76 सार्वजनिक सुट्ट्या देण्यात येतात याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्रित करून जवळपास 124 दिवस शाळांना सुट्टी असते.
उन्हाळा ऋतू सुरू झाल्यानंतर सकाळ सत्रातील शाळेनंतर परीक्षा त्याचबरोबर उन्हाळी सुट्टीचे वेध मुलांना लागू लागतात.
सन 2024-24 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल, असे शाळांनी नियोजन केले आहे. 1 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर मेपासून शाळांना उन्हाळा सुट्टी (Summer Vacation) असणार आहे.
शाळांना 1 मेपासून उन्हाळी सुट्टी
शाळा आणि विद्यार्थ्यांना 1 मे ते 14 जून अशी एकत्रित उन्हाळी सुट्टी असणार आहे.अंतिम परीक्षेचे नियोजन करून व्यवस्थित परीक्षा पडल्यानंतर निकाल जाहीर करण्याची जबाबदारी शिक्षकावर असणार आहे.साधारणपणे 1 मे रोजी वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर होणार आहे.
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत आता बंद झाली असल्याने शाळांनी त्या विद्यार्थ्यांचे पेपर जतन करुन ठेवावे लागणार आहे.
– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जुलैत फेरपरीक्षा
बालकांचा मोफत व सक्षम शक्तीचा अधिनियम 2009 नुसार राज्यातील सर्व मुलांना आठवीपर्यंत पास करण्याची पद्धत राज्य सरकारने यामध्ये बदल केला असून आता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बोर्डाप्रमाणे होणार असून अध्ययनक्षमता प्राप्त न करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी नापास किंवा अनुप्तीर्ण केले जाणार आहे.
परंतू,असे असले तरी सदरील विद्यार्थ्यांची तयारी शिक्षकांना करून घेऊन, जुलै महिन्यात या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेस पात्र होण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे.