BSNL Recharge : बीएसएनएलने आपल्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी आणखी एक स्वस्त रिचार्ज योजना सुरू केली आहे. कंपनीच्या या प्रीपेड योजनेत वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळतात. या योजनेत वापरकर्त्यांना दीर्घ वैधता देखील मिळेल.
BSNL Recharge Offers
बीएसएनएलने आणखी एक स्वस्त रिचार्ज योजना सुरू केली आहे.सदरील योजनेत वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगसह डेटा आणि Free SMS चाही लाभ मिळतो. भारत संचार निगम लिमिटेड आपल्या स्वस्त योजनांद्वारे खासगी दूरसंचार कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियाला तगडी स्पर्धा देत आहे.
बीएसएनएल कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी कमी किमतीत दीर्घ वैधतेच्या अनेक स्वस्त योजना सतत सुरू करत आहे. तसेच, बीएसएनएल आपल्या नेटवर्कला अपग्रेड करण्यासाठी नवीन 4G मोबाइल टॉवरही बसवत आहे. कंपनीने आतापर्यंत 65,000 नवीन 4G मोबाइल टॉवर सुरू केले आहेत. लवकरच कंपनी ही संख्या 1 लाखांपर्यंत वाढवणार आहे.
बीएसएनएलची नवीन रिचार्ज ऑफर
बीएसएनएलने आपल्या अधिकृत X हँडलवरून या नवीन रिचार्ज योजनेची माहिती शेअर केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडची ही प्रीपेड योजना 347 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या प्रीपेड रिचार्ज योजनेत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यात वापरकर्त्यांना संपूर्ण भारतात फ्री अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय दिल्ली आणि मुंबईच्या MTNL क्षेत्रासह संपूर्ण भारतात फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ मिळेल.
बीएसएनएलच्या या प्रीपेड रिचार्ज योजनेत वापरकर्त्यांना दररोज 2GB हाय स्पीड डेटाचा लाभ दिला जात आहे. तसेच,वापरकर्त्यांना यात दररोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतात. भारत संचार निगम लिमिटेड आपल्या या योजनेत वापरकर्त्यांना 54 दिवसांची वैधता देत आहे. इतकेच नाही, वापरकर्त्यांना BiTV चे फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे. यामध्ये वापरकर्ते आपल्या मोबाईलवर 450 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि OTT ॲप्सचा फ्री एक्सेस मिळवू शकतात.
https://twitter.com/BSNLCorporate/status/1891076295972253799?s=19
बीएसएनएलचे चांगले दिवस
सरकारी दूरसंचार कंपनीचे चांगले दिवस आले आहेत. सरकारने गेल्या काही दिवसांत पब्लिक सेक्टरच्या टेलिकॉम कंपनीला पुनरुज्जीवित करण्यासाठी 6,000 कोटी रुपयांच्या नवीन पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रीय कॅबिनेटने गेल्या काही दिवसांत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या नेटवर्कला अपग्रेड करण्यासाठी या अतिरिक्त पॅकेजला मंजुरी दिली आहे. बीएसएनएल वापरकर्त्यांना संपूर्ण भारतात उत्तम कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळू शकेल.