Old Age Pension : राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतन धारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.०१.०१.२०१९ पासून सुधारित वाढ करण्यात येणार आहे.शासनाने असाही आदेश दिला आहे की, सदर दर दि.०१.०१.२०२४ पासून सुधारित करण्यात येईल.
Old Age Pension Hike
मित्रांनो, सदरील दर 1 जानेवारी 2024 पासून देणार आहे.तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.
सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तिवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी यांच्यावर राहणार आहे.
Pension Scheme New Chart
- वय वर्षे ८० ते ८५ – निवृत्तिवेतनात २०% वाढ
- वय वर्षे ८५ ते ९० निवृत्तिवेतनात ३०% वाढ
- वय वर्ष ९० ते ९५ निवृत्तिवेतनात ४०% वाढ
- वय वर्षे ९५ ते १०० निवृत्तिवेतनात ५०% वाढ
- वय वर्षे १०० पेक्षा अधिक निवृत्तिवेतनात १००% वाढ
निवृत्ती वेतन योजना लागू असणाऱ्या सर्व घटकातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून यामध्ये मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था,कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे,यांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील.
कुटुंब निवृत्ती वेतन योजना
कुटुंब निवृत्ती वेतन योजना धारकांना फायदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन शासनाने असाही आदेश दिला आहे की,जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहतील.
मित्रांनो,निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.