Investment Tips : नमस्कार मित्रांनो, आजच्या घडीला बाजारात पैसे गुंतवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात परंतु सद्यस्थितीमध्ये शेअर बाजारातील चढ-उतार गुंतवणूकदारांचे डोकेदुखी ठरत आहे. अशावेळी आपण जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल,तर कोणत्या पर्यायाचा विचार करावा ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो, पैसे गुंतवण्यासाठी सद्यस्थितीत इक्विटी म्हणजे शेअर मार्केट सोने किंवा PPF या गोष्टींकडे लोकांचा ओढा वाढताना दिसत आहे. आता या तिन्ही पर्याय पैकी कोणत्या ठिकाणी पैसा गुंतवावा हा विचार डोक्यात घोळत असतो, तर चला बघूया कोणता मार्ग अधिक सोयीस्कर ठरू शकतो.
Share Market Investment Tips
शेअर मार्केट : जर तुमच्याकडे दीर्घकालीन गुंतवणुकी ची क्षमता असेल आणि जास्त परतवा कमवायचा असेल तर शेअर मार्केट आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून शेअर होल्डर कंपनीच्या वाडी बरोबर चांगली कमाई किंवा अर्धवा मिळू शकतो.
फायदे : शेअर बाजारातील इक्विटी मध्ये पैसा गुंतवणूक क्षमता उत्तम परतवा देण्याची असून खरेदी विक्री करणे सोपे आहे. विविध कंपन्यांचा समावेश किंवा शेअरचा समावेश आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये करू शकतो.
तोटे : आता इक्विटीचा तोटा म्हणजे बाजारातील चढ-उतार अनुभवी व्यक्ती बाजारातील चढ-उताराचा विचार करून शेअर्स निवडतात त्यामुळे इक्विटी मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.
Gold investment (सोने खरेदी)
सोने ही नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण त्याचे मूल्य सामान्यता स्थिर राहते आज बहुतेक सोनव्यतिरिक्त सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB), गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्ड सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये आपण सोने खरेदी न करता गुंतवणूक करू शकतो जगात कोणतेही संकट आले तर सोन्याची किंमत वाढते.
सोनेरी खरेदीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे सोन्याची विक्री होईपर्यंत गुंतवणुकीतून कोणतेही उत्पन्न मिळत नाही.सोन्याच्या किमतीत बऱ्याच वेळा झपाट्याने चढ-उतार पाहायला मिळतात.
Public Provident Fund
PPF चा विचार करायचा झाल्यास भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक सरकारी बचत योजना आहे. पीडीएफ मध्ये गुंतवणूक केल्यास निश्चित परतावा आणि कर लाभ दोन्ही फायदे मिळतात.जर जास्त जोखीम न घेता दीर्घ मदतीसाठी पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली, तर चांगला परतावा मिळू शकतो.
सरकारकडून यावर विशिष्ट व्याजदर दरवर्षी जाहीर करण्यात येतात. विशेष म्हणजे पीपीएफ वर मिळणारे व्यास सुद्धा करमुक्त असते.
पीपीएफचा लॉक-इन कालावधी 15 वर्षे असल्याने गुंतवणूकदारांसाठी समस्या असू शकतो.गरज पडल्यावर लगेच पैसे काढणे कठीण असते.
तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल?
आता प्रश्न येतो गुंतवणूक कुठे करावी तर मित्रांनो आपल्याला जास्त परतावा आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर, शेअर मार्केट चांगला पर्याय ठरू शकतो.
आपल्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेअर आणि चांगल्या कंपन्यांची निवड केल्यास आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. परंतु यासाठी जोखीम पत्करणे सुद्धा आवश्यक आहे निश्चित परतावा आणि कर बचत हवे असेल तर आपण पीपीएफ चा सुद्धा पर्याय अवलंबू शकता.