Gratuity Money : ग्रॅच्युईटी म्हणजे काय ? जर शेवटचा पगार 40 हजार असणाऱ्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युईटी मिळणार? पहा….

Gratuity Money : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठराविक सेवा केल्यानंतर वेगवेगळे लाभ मिळत असतात. यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रॅच्युइटी होय.

मित्रांनो,आता ग्रॅच्युइटी म्हणजे काय ? तर झोप या शब्दात सांगायचं झालेत ठराविक सेवा केल्यानंतर कंपनी किंवा सरकारकडून कर्मचाऱ्याला बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम होय.

भारतात ग्रॅच्युईटी वेतन कायदा,1972 अंतर्गत ग्रॅच्युईटी लाभ दिला जातो. सलग पाच वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला हा हक्क प्राप्त होतो.

ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते ?

ग्रॅच्युईटीची गणना करण्याचा फॉर्म्युला खरोखरच सोपा आहे.ग्रॅच्युईटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन सेवेबद्दल आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो.जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 40 हजार रुपये असेल आणि कर्मचाऱ्याने 20 वर्षे सेवा केली असेल, तर त्याला मिळणारी ग्रॅच्युईटी किती मिळणार हे आपण पाहणार आहोत.

ग्रॅच्युईटीबाबत महत्त्वाचे नियम

1.अधिकतम मर्यादा : सध्या ग्रॅच्युईटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपये आहे.

2. कर सवलत : 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युईटी करमुक्त असते.

5 वर्षांच्या सेवेनंतरच पात्रता

  • 5 वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास ग्रॅच्युईटी मिळत नाही (काही अपवाद वगळता).
  • जर सेवा 4 वर्षे आणि 8 महिने असेल, तर ती 5 वर्षे मानली जाते.
  • जर सेवा 4 वर्षे आणि 7 महिने असेल, तर ती फक्त 4 वर्षे मानली जाते.
  • कर्मचाऱ्याच्या मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत, 5 वर्षांची सेवा पूर्ण नसली तरी वारसांना ग्रॅच्युईटी दिली जाऊ शकते.
  • ग्रॅच्युईटी = शेवटचा पगार × काम केलेली वर्षे × (15/26)
  • ग्रॅच्युईटी = 40,000 × 20 × (15/26)
  • ग्रॅच्युईटी = 4,61,538 रुपये
हे पण वाचा ~  Gratuity Rule 2025 : बापरे …… तर "या" कर्मचाऱ्यांना मिळणार नाही ग्रॅच्युइटी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय !

Gratuity Money Tips

  • दीर्घकालीन स्थिर नोकरी केल्यास ग्रॅच्युईटीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळतो.
  • ज्या कंपनीत ग्रॅच्युईटी योजना लागू नाही, तेथे काम करताना कराराची माहिती घ्यावी.
  • ग्रॅच्युईटीबाबत कोणत्याही समस्येसाठी कामगार न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहे.
  • ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार असते आणि दीर्घ सेवेनंतर आर्थिक स्थिरता मिळविण्यास मदत होते.

आपण वर दिलेल्या उदाहरणानुसार, 40 हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 20 वर्षांच्या सेवेनंतर 4 लाख 61 हजार 538 रुपये ग्रॅच्युईटी मिळू शकते. कर्मचाऱ्यांना आपली सेवा वर्ष झाली यावरून ग्रॅच्युईटीचा अंदाज घेता येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!