Confidential Reports : शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे काम व वर्तणूक याबाबतच्या सर्वसाधारण बाजू पूर्णांशाने समाविष्ट करण्याच्या दृष्टीने गोपनीय अहवाल लिहिण्याचे सुधारीत प्रपत्र (परिशिष्ट “ब”) तयार करण्यात आले आहे.
Employees Confidential Reports
सरकारी कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याची प्रक्रिया खालील प्रकारे आहेत.
सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गोपनीय अहवाल (Confidential Reports) लिहिण्याची सुधारित प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील अहवाल “गट-अ, गट-ब, आणि गट-क” मधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लिहिले जातील.
गोपनीय अहवाल लिहिण्याची प्रक्रिया
गोपनीय अहवाल परिशिष्ट – ब
- भाग – 1 : नवीन कर्मचाऱ्यांसाठी प्रथम गोपनीय अहवाल लिहिताना वापरावे.
- भाग – 3 : कर्मचाऱ्यांनी स्वतःचे स्वयंमूल्यांकन भरावे.
- भाग – 4 : प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन लिहावे.
- भाग – 5 : पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी अहवालाचे पुनर्विलोकन करावे.
गोपनीय अहवाल लिहिण्याची वेळ
दरवर्षी 31 मार्चपर्यंत संपणाऱ्या वर्षासाठी गोपनीय अहवाल लिहावेत.अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा 3 महिने किंवा अधिक असल्यास त्यांचेही अहवाल लिहावेत. प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याचे काम किमान 3 महिने पाहिले पाहिजे. 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी अहवाल लिहू नये.
गोपनीय अहवालाची भाषा आणि स्वरूप
अहवाल शक्यतो मराठी मध्ये लिहावेत.प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी स्वहस्ताक्षरित अहवाल लिहावेत.अहवाल 15 मेपर्यंत संस्करणासाठी सादर करावेत.संस्करण अधिकाऱ्यांनी 30 जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना अहवालाची प्रत द्यावी.कर्मचाऱ्यांना 30 दिवसांच्या आत अहवालावर अभिवेदन सादर करण्याची संधी द्यावी.
कर्मचारी मूल्यमापन प्रतिकूल शेरे
साधारण, सर्वसाधारण, कमी किंवा वाईट शेरे प्रतिकूल समजावेत.प्रतिकूल शेरे लिहिताना निश्चित पुरावा असणे आवश्यक आहे.
कर्मचारी गोपनीय अहवाल PDF प्रत येथे डाऊनलोड करा ➡️ Confidential Reports PDF
गोपनीय अहवाल हे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी आहेत. अहवाल लिहिताना वैयक्तिक आणि मोघम शेरे टाळावेत.कर्मचाऱ्यांच्या सचोटी आणि चारित्र्याचे मूल्यमापन करताना काळजी घ्यावी.