Close Visit Mhshetkari

Aaswasit Pragati Yojana : मोठी बातमी… आता “या” राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू! शासन निर्णय निर्गमित….

Aaswasit Pragati Yojana : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर ची स्थापना सन २००० मध्ये करण्यात आली असून संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक २ जुलै, २००१ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील कृषि विद्यापीठातील तत्कालीन पशुवैद्यकीय, दुग्धतंत्रज्ञान व मत्स्य विज्ञान महाविद्यालये / संस्था/प्रक्षेत्रे येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसह महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.

राज्य शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू असलेली कालबध्द पदोन्नती योजना बंद करुन त्याऐवजी वित्त विभागाच्या दिनांक २० जुलै २००१ च्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केलेली होती.

Sudharit Aaswasit Pragati Yojana

दिनांक २८ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महविद्यालय व इतर संस्थामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ स्थापनेपासून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे.

राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती, २००८ ने आपल्या अहवालात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतही शिफारस केली होती.दि.१ एप्रिल,२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्यात आली होती.

सदर “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि त्यांच्या नियंत्रणाखालील महविद्यालय व इतर संस्थामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा ~  Unified Pension Scheme : आठव्या वेतन आयोगामुळे UPS पेन्शनवर काय होणार परिणाम? पहा निवृत्त कर्मचाऱ्यांना किती होणार फायदा ...

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महविद्यालय व इतर संस्थामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासाठी संबंधित पद धारकांना १२ वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्याची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित करून, कृषि विद्यापीठे व उच्च व तंत्र शिक्षण विभागाला मान्यता दिल्याप्रमाणे २ लाभांची “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महविद्यालय व इतर संस्थामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करताना वित्त विभागाच्या शासन निर्णय, दि.१ एप्रिल, २०१०, दि.५ जुलै, २०१० व दि. ६ सप्टेंबर, २०१४ मधील सर्व तरतूदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहेत.

सदरील “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” अंतर्गत येणारा खर्च हा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. तथापि, सदर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ अदा करण्यापूवी आवश्यक त्या कार्यपध्दतीचा अवलंब करावा. तसेच सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. ५२७/२०२४/व्यय२, दि. २०/१२/२०२४ आणि क्र. १६६/२०२४/आपुक, दिनांक ०६/०८/२०२४ अन्वये मिळालेल्या सहमती नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!