Pan Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पॅन कार्ड हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून पॅन कार्ड शिवाय कोणत्याही कामाला मुहूर्त लागत नाही.अशावेळी सरकारी कामांसाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
इन्कम टॅक्स विभाग त्याचबरोबर ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून सुद्धा याचा वापर होतो. पॅन कार्ड नसल्यास आर्थिक देवाण-घेवाण करण्यास अडचण येऊ शकते.जर का तुमचे पॅन कार्ड दहा किंवा वीस वर्षांपूर्वी काढले असेल, तर अशा वेळेस नवीन पॅन कार्ड घ्यावे का नेमकं काय करावं ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Pan card new updates
पॅन कार्ड महत्त्वाचा दस्तावेत असल्याने त्याचा नेहमी वापर होतो अशा वेळी 10 वीस वर्षे झाल्यानंतर थोडे खराब होते किंवा त्यावरती अक्षरे पुसद होतात.पॅन कार्ड वरील नंबर हा खूप महत्त्वाचा असल्याने,त्यावरती जर तो अस्पष्ट दिसला तर अशावेळी पॅन कार्ड झेरॉक्स काढायला गेले तर ते नीट दिसत नाही.त्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना आपल्याला करावा पण करावा लागतो.अशावेळी पॅन कार्ड नवीन काढावे लागते का कायदा काय सांगतो ? घेऊया जाणून.
आयकर विभाग व कायदे तज्ञ असे सांगतात की जुन्या पॅन कार्ड संबंधी काही नियम सांगितलेले आहेत.ज्यामध्ये जुने पॅन कार्ड बदलण्याची गरज नाही, कारण पॅन कार्ड क्रमांक हा आयुष्यभरासाठी वैद्य असतो.एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड क्रमांक मिळत असतो, त्यामुळे जुने झालेले पॅनकार्ड आपण परत काढण्याची गरज नसून त्यामध्ये आपण दुरुस्ती किंवा दुय्यम प्रत आपण ऑनलाईन काढू शकतो.आता हे ऑनलाइन पॅन कार्ड कसे अप्लाय करायचे याविषयी माहिती बघूया .
नवीन पॅनकार्डसाठी करु शकता अप्लाय
नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आपण एनएसडीएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता.किंवा आयकर विभागाच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन सुद्धा आपण जुने पॅन कार्ड दुरुस्ती करण्यासाठी अप्लाय करू शकता.
ऑनलाइन भरलेला फॉर्म खराब झालेले पॅन कार्ड आपल्याला डुप्लिकेट पॅन कार्ड म्हणून काढता येऊ शकते.यामध्ये आपल्याला फोटो जन्मतारीख आधार लिंक करायचे असेल, तरीसुद्धा आपण जुने पॅन कार्ड दुरुस्ती करू शकता.
good