Unified Pension Scheme : केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) सुरू केली आहे.
मित्रांनो ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. सदरील स्कीमचा उद्देश सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा (Financial Security) पुरवणे हा आहे.
Unified Pension Scheme Update
UPS स्कीममध्ये जुनी पेन्शन स्कीम (OPS) आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) या दोन्ही योजनांचे फायदे एकत्रित करण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक समस्या येणार नाहीत.
युनिफाइड पेन्शन स्कीमचे मुख्य फायदे
- Guaranteed Pension : – सेवानिवृत्तीपूर्वीच्या १२ महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५०% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे.किमान २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा फायदा लागू आहे.
- Proportional Pension : – ज्यांनी १० वर्षांपेक्षा जास्त पण २५ वर्षांपेक्षा कमी सेवा केली आहे, त्यांना आनुपातिक पेन्शन मिळेल.
- Minimum Pension :- किमान १० वर्षे सेवा पूर्ण केल्यास, कर्मचाऱ्यांना १०हजार रुपये प्रतिमाह किमान पेन्शन मिळणार आहे.
- Family Pension :- कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या स्थितीत, पेन्शन रकमेपैकी ६०% रक्कम कुटुंबाला पारिवारिक पेन्शन म्हणून मिळणार आहे.
- Financial Security : – या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहता येईल.
युनिफाइड पेन्शन स्कीमसाठी पात्रता
- सदरील योजना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे.
- कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत UPS चा पर्याय निवडला पाहिजे.
- किमान १० वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
मानदंड | युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) | राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) |
---|---|---|
पेन्शन प्रकार | निश्चित पेन्शन (Guaranteed Pension) | बाजाराच्या परताव्यावर आधारित पेन्शन |
आर्थिक सुरक्षा | सेवानिवृत्तीनंतर स्थिर आय मिळते | बाजाराच्या उतार-चढावावर अवलंबून |
किमान पेन्शन | १०,००० रुपये प्रतिमाह | नाही |
कुटुंब पेन्शन | ६०% पेन्शन रक्कम कुटुंबाला मिळते | मर्यादित |