Close Visit Mhshetkari

Gratuity Family Pensions : मोठी बातमी.. आता ‘या ‘ DCPS/NPS धारकांना मिळणार सेवानिवृत्ती उपदानसह फॅमिली पेन्शन व रुग्णता निवृत्त्ती वेतन योजना लागू ….

Gratuity Family Pensions : मित्रांनो, DCPS /NPS सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

Gratuity and Family Pensions

दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी जो DCPS /NPS योजनेचा सदस्य असलेल्या खालील लाभ मिळणार आहेत.

(अ) शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान

(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान (Gratuity) लागू करण्यात आली आहे.

कुटुंब निवृत्तिवेतन/रुग्णता निवृत्तिवेतन

सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन/रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.आता १००% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे.

कुटुंब निवृत्तिवेतन/रुग्णता निवृत्तिवेतन कुटुंब निवृत्तिवेतन/रुग्णता निवृत्तिवेतननवीन DCPS/NPS अंतर्गत दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे. 

हे पण वाचा ~  Professional Tax : आनंदाची बातमी ... आता "या" कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा कपात होणाऱ्या व्यवसाय करात सूट! वेतनात 2500 रुपये ....

सदरील कार्यपद्धती निश्चित करताना जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारासह लागू राहील.

सदर आदेश निर्गमित करताना जे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिभाषित अंशदान डीसीपीएस / एनपीएस योजनेचे सदस्य आहेत, आणि ज्यांची नियुक्ती ०१.११.२००५ पूर्वी झाली आहे, परंतु ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे पद दि.०१.११.२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आले असल्याने त्यांचे बाबतीत आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या दिनांक ३०/०५/२०२४ रोजीच्या परिपत्रकामध्ये फॅमिली पेन्शन वर ग्रॅज्युएटी संदर्भात अनुज्ञेय कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!