Close Visit Mhshetkari

Satbara Utara : मोठी बातमी… 50 वर्षांनंतर ७/१२ उताऱ्यात तब्बल ११ बदल; तुम्हाला माहित आहे का? पहा सविस्तर …

Satbara Utara : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की शेत जमिनी चा सर्वात महत्त्वाचा पुरा म्हणजे सातबारा होय.

जमिनीची खरेदी विक्री करण्यास किंवा कर्ज घेणे असो मालमत्तेशी संबंधित वाद असो यासाठी सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा किंवा दस्तऐवज मानले जाते.

आता महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आता आपला सातबारावर 11 महत्त्वाची बदल होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Satbara Utara New Changes

सातबारा उताऱ्यात करण्यात आलेले 11 महत्त्वाचे बदल

1) गावाच्या नावासोबत गाव नमुना -7 मध्ये आता गावाचा कोड क्रमांक (Local Government Directory) दिसेल.

2) आता लागवडीयोग्य आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाऊन त्यांची एकूण बेरीज दाखवली जाते.

3) शेतीयोग्य जमिनीसाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’, तर बिनशेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येते.

4) खाते क्रमांक ‘इतर हक्क’ मध्ये दिला जात होता;आता तो खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर असतो.

5) मयत खातेदारांच्या नोंदणीत मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाते.

हे पण वाचा ~  Google Pay Loan : आता घरबसल्या Google Pay वरून मिळवा 50 हजार रुपयांपर्यंत लोन! पहा संपूर्ण प्रक्रिया .... 

6) फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जमिनींसाठी ‘प्रलंबित फेरफार’ हा स्वतंत्र रकाना तयार केला जातो.

7) सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे.

8) आता दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येईल.

9) गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाईल.

10) बिगरशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हेच एकक राहणार असून, जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहेत.

11) अकृषिक म्हणजे बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी आता “सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने गाव नमुना-12 लागू नाही” अशी सूचना दिली जाणार आहे.

सरकारने 3 मार्च 2020 रोजी ७/१२ आणि ८-अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासही मान्यता दिली आहे. सदरील सुधारणांमुळे Satbara Utara अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यास सोपा झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!