Close Visit Mhshetkari

Income Tax Calculator : जर 4 लाखापासून पुढे 5% टॅक्स मग,12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त कसे ? सावधान “या” उत्पन्नावर भरावा लागणार आयकर …

Income Tax Calculator : भारतातील नवीन कर सुधारणांनुसार,१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर माफी देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत सर्व प्रकारच्या उत्पन्नावर लागू होत नाही. विशेषतः Special Rate Income वर कर आकारला जातो. 

जर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा कमी असेल, पण त्यात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG),लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG), किंवा लॉटरीतून मिळालेले उत्पन्न समाविष्ट असेल, तर तुम्हाला कर भरावा लागू शकतो.

Income Tax Relief Calculator   

सेक्शन 87A नुसार करमुक्त उत्पन्न

  • ० ते ४ लाख रुपये : कोणताही कर लागत नाही
  • ४ ते ८ लाख रुपये : ५% कर (२०,००० रुपये)
  • ८ ते १२ लाख रुपये : १०% कर (४०,००० रुपये)
  • एकूण कर : १२ लाख रुपयांपर्यंत ६०,००० रुपये कर

स्टँडर्ड डिडक्शन ( Standard Deduction)

स्टँडर्ड डिडक्शन म्हणून ‘७५,००० रुपये” वजा केले जातात. म्हणून, १२.७५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कर भरावा लागत नाही.

स्पेशल रेट इन्कमवर कर

जर तुमच्या उत्पन्नात खालील प्रकारचे उत्पन्न समाविष्ट असेल, तर तुम्हाला कर भरावा लागू शकतो.

  • शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) : इक्विटी शेअर्सवर १५% कर
  • लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) : इक्विटी शेअर्सवर १ लाखापेक्षा जास्त रकमेवर १०% कर
  • लॉटरी, जुगार, इतर स्पेशल इन्कम : ३०% कर
हे पण वाचा ~  Income Tax New Slabs : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५; आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर माफीची मोठी घोषणा ..

मार्जिनल रिलीफची संकल्पना

जर तुमचे उत्पन्न “१२.७५ लाख रुपयांपेक्षा” किंचित जास्त असेल (उदा., १२.७६ लाख रुपये), तर तुम्हाला मार्जिनल रिलीफचा लाभ मिळू शकतो. या संकल्पनेनुसार, जर कराची रक्कम उत्पन्नातील वाढीपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला फक्त १ हजार रुपये कर भरावा लागेल.

उदाहरण

  • उत्पन्न : १२.७६ लाख रुपये.
  • कर : ६०,१५० रुपये + ४% सेस = ६२,५५६ रुपये.
  • मार्जिनल रिलीफ : १,००० रुपये कर भरावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!