Close Visit Mhshetkari

ATM Card Insurance : आता आपल्या एटीएम कार्डवर मिळणार तब्बल दहा लाख रुपयाचा विमा! पहा कसा घेता येतो फायदा… 

ATM Card Insurance : आजच्या डिजिटल युगात एटीएम कार्ड (ATM Card) हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आणि रुपे कार्ड (RuPay Card) मुळे एटीएम कार्डचा वापर वाढला आहे. यामुळे रोख रकमेवरील अवलंबित्व कमी तर व्यवहार सुलभ झाले आहेत. 

मित्रांनो,बऱ्याच लोकांना माहित नसते की एटीएम कार्डद्वारे मोफत विमा सुविधा (Free Insurance) मिळू शकते. ही सुविधा अपघाती विमा (Accidental Insurance) आणि जीवन विमा (Life Insurance) अशा दोन्ही प्रकारची असते.

एटीएम कार्डवर मोफत विमा सुविधा

बऱ्याच बँका त्यांच्या डेबिट कार्डधारकांना मोफत विमा सुविधा पुरवतात. ही सुविधा अपघाती मृत्यू (Accidental Death) आणि अकाली मृत्यू (Untimely Death) या दोन्ही प्रकारच्या जोखिमांवर संरक्षण देते. विम्याची रक्कम कार्डच्या प्रकारानुसार १ लाख रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.

विमा सुविधेचा लाभ कसा मिळतो?

  • कार्डचा वापर : जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरत असाल, तर तुम्हाला ही विमा सुविधा मिळू शकते.
  • व्यवहाराची आवश्यकता : काही बँका विमा सुविधा सक्रिय करण्यासाठी ठराविक कालावधीत (उदा., ३० दिवस किंवा ९० दिवस) किमान एक व्यवहार करणे आवश्यक असते.
  • अतिरिक्त कागदपत्रे नको : या विमा सुविधेसाठी बँकेकडून कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते.
हे पण वाचा ~  Top 5 ELSS Fund : बापरे ... पैशांचा पाऊस! एका वर्षात मिळाला तब्बल 81 % रिटर्न्स; पहा टॅक्स वाचवणारे टॉप 5 ELSS फंड ..

प्रमुख बँकांच्या विमा सुविधा

1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) :

गोल्ड एटीएम कार्ड: ४ लाख रुपये (एअर अपघात), २ लाख रुपये (नॉन-एअर अपघात).

प्रीमियम कार्ड. : १० लाख रुपये (एअर अपघात), ५ लाख रुपये (नॉन-एअर अपघात).

2. HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक :

या बँका त्यांच्या डेबिट कार्डधारकांना १ लाख रुपयांपासून ते ३ कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण देतात.

विम्याचा दावा कसा करायचा?

जर कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांनी खालील पायऱ्या पार कराव्यात:

1. बँकेला घटनेबाबत माहिती द्यावी.

2. अपघाताचा तपशील आणि मृत्यूचा दाखला सादर करावा.

3. कार्डधारकाचे खाते तपशील आणि कार्डची माहिती सबमिट करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!