SBI Recurring : ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या उतारावयामध्ये आपल्याजवळ असलेली जबाबपुंजी कुठे गुंतवावी हा प्रश्न पडत असतो.सर्वसामान्य असे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपले गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये आरडी काढून गुंतवतात, परंतु पोस्ट ऑफिस पेक्षा सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चांगला व्याजदर किंवा परतावा सध्या मिळत आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
SBI Bank Recurring Scheme
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI),आयसीआयसीआय बँक (ICICI Bank),एचडीएफसी बँक (HDFC Bank) यासह अनेक बँकांव्यतिरिक्त,पोस्ट ऑफिस देखील RD scheme offer करत आहेत.आज आपण post office आणि sbi bank च्या \”Recurring deposit Scheme\” बद्दल जाणून घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी आरडी ऑफर करत आहे. स्टेट बँक सामान्य नागरिकांना रिगरिंग डिपॉझिटवर ६.५% ते ७% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७% ते ७.५% व्याज दर देत आहे. सदरील व्याजदर दि १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झालेले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया व्याजदर
- १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी ६.८०% (सर्वसाधारण) ७.३०% (ज्येष्ठ नागरिक)
- २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी ७% (सर्वसाधारण) ७.५०% (ज्येष्ठ नागरिक)
- ३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी ६.५० (सर्वसाधारण) ७% (ज्येष्ठ नागरिक)
- ५ वर्षे आणि १० वर्षांपर्यंत ६.५० (सर्वसाधारण) ७.५०% (ज्येष्ठ नागरिक)
Post office RD Offers
सध्या पोस्ट ऑफिसमध्ये RD गुंतवणूक ५ वर्षांच्या Authority येते.पोस्ट ऑफिस रिकरिंग योजना senior citizens साठी अतिरिक्त व्याज देत नाही.सध्या पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवणूक केल्यास ५ वर्षांसाठी ६.५ % दराने व्याज दिले जाते.सदरील व्याजदर दि.१ जुलै २०२३ पासून लागू आहेत.