Mahapar Pranali : शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १.११.२०११ नुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत.
दिनांक ७.२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये “गट-अ आणि गट-ब (राजपत्रित)” संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून “महापार” (Mahapar Pranali) या प्रणालीद्वारे ऑनलाईन लिहिण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
महापार संगणक प्रणाली
जे राज्य शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था/मंडळे/महामंडळे/प्राधिकरणे या सेवांमध्ये (महापार या प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या) प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत त्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून शक्य तितक्या टप्प्यापर्यंत “महापार” या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावेत आणि त्यानंतरचे टप्पे ऑफलाईन पध्दतीने नोंदवून ते कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावेत, अशाही सूचना शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१८ अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.
तथापि, उपरोक्त सूचनांचे पालन केले जात नाही तसेच, आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले असतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याची कार्यवाही विहित वेळेत महापार या संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांना पुनःश्च खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
आता आस्थापना मंडळासमोर प्रस्ताव सादर करतांना विचारक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक आहे.
राज्य शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था/मंडळे/महामंडळे/प्राधिकरणे या सेवांमध्ये (महापार या प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या) प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यमापन अहवाल शक्य तितक्या टप्प्यापर्यंत महापार” या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतरचे टप्पे ऑफलाईन पध्दतीने नोंदवून ते कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात येणार आहे.
प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिका-यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याची जबाबदारी ही त्यांच्या मूळ विभागाच्या संस्करण अधिकाऱ्याची राहील.