HRA Allowance : आता ‘ या ‘ सरकारी कर्मचाऱ्यांना भाडेमाफ निवासस्थानाऐवजी घरभाडे भत्ता मंजूर होणार; परिपत्रक निर्गमित …

HRA Allowance : महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक, क्रमांक घभाभ-१०००/प.. क्र.६१/सेवा-५, दिनांक २४/०५/२००१ अन्वये मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील नियम ८५० खालील तरतुदीअन्वये, पोलीस अधिकारी/अंमलदार यांना भाडेमाफ निवासस्थानाची सवलत मंजूर करण्यात आली आहे.

HRA Allowance New Update

आता जे कर्मचारी त्यांच्या सेवाशर्तीनुसार, भाडेमाफ निवासस्थान मिळण्यास पात्र आहेत, मात्र ज्यांना अशी निवासस्थाने पुरविण्यात आलेली नाहीत, असे कर्मचारी खालील अटींची पुर्तता करत असतात. 

सदरील अटींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून,शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक घभाव-१४८९/४०/सेवा-५, दिनांक ३०/१२/१९९१ च्या आदेशान्वये दिनांक ०१/०९/१९९० पासून त्यांना त्यांच्या वेतनगटानुसार सर्वसाधारणपणे देय होऊ शकणारा घरभाडे भत्ता तसेच,अधिक वेतनाच्या आधारे ज्या प्रकारचे निवासस्थान मिळण्यास संबंधित कर्मचारी पात्र असेल त्या प्रकारच्या निवासस्थानासाठी आकारण्यात येणारे , अनुज्ञाप्ती शुल्क इतकी रक्कम, भाडेमाफ निवासस्थानाच्या बदल्यात घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळण्यास पात्र असतील.

घरभाडे भत्ता सेवाशर्ती व अटी

  • शासकीय निवासस्थाने वाटपासाठी उपलब्ध नसावीत.
  • शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबाच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्य त्याच्यासोबत राहत नसावा,
  • शासकीय कर्मचारी त्याच्या मुख्यालयाच्या नागरी हद्दीत राहात असावा.

मुंबई हे मुख्यालय असणा-या कर्मचा-यांच्या बाबतीत मुंबई नागरी सेवा नियमांतील नियम ४४६ खाली विहीत केलेली नागरी हद्द मानली जाईल.

जर शासकीय कर्मचारी राहात असलेल्या निवासस्थानापेक्षा त्याच्या कर्तव्यस्थानाला जवळ असेल असे कोणतेही निवासस्थान वाजवी अटींवर, म्हणजे त्याला घरभाडेमाफ निवासस्थानाऐवजी मिळणा-या घरभाडेभत्त्याच्या रकमेच्या मर्यादेत भाडे असलेले, मिळविणे शक्य नव्हते, आणि त्याचे निवासस्थान नागरी हद्दीच्या पलीकडे असूनही, त्या पदाशी संलग्न असाणा-या कर्तव्यावर विपरीत परिणाम होत नाही. 

हे पण वाचा ~  8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग! लवकरच होणार मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ ...

या संदर्भात नियंत्रण अधिका-याची खात्री पटून त्याने तसे प्रमाणपत्र जोडल्यास वरोल अट शिथिल करता येईल, नियंत्रण अधिका- याच्या प्रकरणी त्यांच्या लगतच्या वरिष्ठ अधिका-यांनी असे प्रमाणपत्र दयावयाचे आहे.

राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील, पोलीस अधिकारी / अंमलदार यांना भाडेमाफ निवासस्थानाऐवजी घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत सदर परिपत्रकातील वरील टिपमध्ये नमूद केलेल्या मुद्दा विचारात घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

HRA Hike Calculator

सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 50 टक्क्यापेक्षा अधिक होईल, त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये X,Y आणि Z वर्गीकृत शहरांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात, अनुक्रमे 3,2 आणि 1 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

थोडक्यात जुलै 2024 पासून महागाई भत्ता 53% झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांनुसार 27,18, आणि 9 टक्क्याऐवजी आता 30%, 20% आणि 10% प्रमाणे घर भाडे भत्ता दिला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!