Sukanya Samruddhi : ‘सुकन्या समृद्धी’ योजनेत होणार मोठा बदल! आता १ तारखेपासून बदलणार ‘हे’ नियम …

Sukanya Samruddhi : नमस्कार मित्रांनो, आता सुकन्या समृद्धी योजनेत १ ऑक्टोबर २०२४ पासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत.नव्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त खाती असतील तर अतिरिक्त खाते बंद केले जाणार आहे.

Sukanya Samriddhi Yojna

खाते उघडण्यातील विसंगती दूर करण्यासाठी सदर व सुधारणा करण्याचा उद्देश सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. नियमानुसार कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकांनी खाते उघडलेली असे आता बंद करण्यात येणार आहे.

सुकन्या समृद्धी योजनेतील मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्यासाठी पालकत्वाचे अनिवार्य हस्तांतरण करावे लागणार आहे. दरम्यान योजनेनुसार केवळ कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकच सुकन्या समृद्धी खाते उघडू शकणार असून त्याचे व्यवस्थापन करू शकणार आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत राष्ट्रीय बँकेत उघडता येते.साधारणपणे मुलीच्या जन्माच्या वेळी किंवा 10 वर्षाच्या आत सदरील खाते उघडता येते.एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. 

सदरील योजना मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना होती.मोदी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती. सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२० % आहे. 

सुकन्या खाते आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही सरकारने जारी केलेले कोणतेही एक ओळखपत्र
  • सुकन्या समृद्धी योजनेचा खाते उघडण्याचा अर्ज
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • मुलीच्या आई-वडिलांचा किंवा कायदेशीर पालकांचा फोटो
  • पालक किंवा पालकाची केवायसी कागदपत्रे

Sukanya Samriddhi Yojana Calculator

एखाद्या आई-वडिलांनी मुलीचे वय १ वर्ष असताना दरमहा १२ हजार ५०० रुपये जमा केले तर, वर्षाला १.५ लाख रुपये होतात.मुलीचे वय २१ वर्ष होईल तेव्हा ६३.७ लाख रुपये जमा होतील. यामध्ये २२.५ लाख रुपये ही आपली गुंतवणूक असेल तर ४१.२९ लाख रुपये व्याज मिळेल.थोडक्यात ३५.२७ % रक्कम आपली गुंतवणूक रक्कम तर ६४.७३ % रक्कम ही व्याज असणार आहे.

Leave a Comment

error: Don't Copy!!