Sarpanch Salary Hike : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे.ग्रामीण भागातील प्रथम नागरिक असलेले सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sarpanch Salary Hike in Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या बंधनात तब्बल दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान सरपंच सरपंच यांच्या मानधन वाढीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ केली आहे” अशी माहिती दिली.
सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन कसे असणार ?
आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये तर उपसरंपचाचे मानधन दुप्पट म्हणजे १ हजार वरून २ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या २ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान आहे, अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचाचे मानधन ४ हजारांवरून ८ हजार रुपये तर तेथील उपसरपंचांचे मानधन १५०० रुपयांवरून ३ हजार करण्यात आले आहे.
शेवटी ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचे मानधन ५ हजारांवरून १० हजार रुपये तर उपसरपंचाचे मानधन २ हजारांवरून आता ४ हजारांपर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.