Gold Loan : सोने तारण कर्ज घेणे परवडते का ? पहा गोल्ड लोनचे फायदे,तोटे, कागदपत्रे आणि सर्व प्रोसेस..

Gold Loan : नमस्कार मित्रांनो, माणूस विविध आर्थिक संकटनातून बाहेर पडण्यासाठी विविध बँक कर्जांचा आधार घेत असतो. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज त्याचबरोबर सोने तारण कर्जाचा सुद्धा यामध्ये सहभाग असतो.

गोल्ड लोनच्या माध्यमातून आपण कोणत्याही कटकटी शिवाय लगेच एक रक्कमी कर्जाची रक्कम मिळू शकता.

गोड लोन हे सुरक्षित कर्जामध्ये मोडते. सोने तारण कर्जाचे आणखी काय फायदे आहे ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Gold loan Calculator 2024

सोन्यावर किती कर्ज मिळते? मित्रांनो,आपल्याला माहिती असायला हवा की वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोनेतारण कर्जावरती व्याजदर अतिशय कमी असतात. सोन्याच्या किमती 18, 22 आणि 24 कॅरेटच्या प्रकारावर अवलंबून असतात. अठरा कॅरेट किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा तुम्ही सोने तारण कर्जासाठी अर्ज करू शकता.

गोल्ड लोन संदर्भात बँका आणि वित्तीय संस्था त्यानुसार किमान आणि कमाल रक्कम ठरवते.RBI ने सोन्याच्या कर्जाची मर्यादा 75% निश्चित केली आहे.साधारणपणे एका तोळ्याला 50 हजार रुपये पर्यंत गोल्ड लोन मिळते.क्रेडिट स्कोअरची आवश्यकता लागता नाही. विशेष म्हणजे गोल्ड लोन घेतल्यानंतर आपल्याला हप्ते भरण्याची किंवा EMI Paid करण्याची गरज नसते.दरवर्षी रिन्यू करून आपण कर्ज व्याज परतफेड करू शकतो.

Gold loan Documents

  • ओळख प्रमाणपत्र :- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र 
  • रहिवासी पुरावा :- मतदार ओळखपत्र,आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
  • उत्पन्नाचा पुरावा
  • अर्जासह दोन पासपोर्ट फोटो

सोन्याला सुरक्षा मिळते का?

तुमचे सोने सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकांची असते.ग्राहकाला सोन्याची काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता राहत नाही.

सोने तारण कर्ज शुल्क ?

गोल्ड लोन देणाऱ्या विविध बँकांमध्ये कर्जाचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क वेगवेगळे असते. बरेच बँकांमध्ये आता जीएसटी सुद्धा आकारल्या जातो आहे. ग्राहकांना आता गोल्ड अप्रेसर शुल्कदेखील भरावे लागते.

Leave a Comment

error: Don't Copy!!