Employees Leaves : मुंबई नागरी सेवा नियमांतील विद्यमान तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश, हे विषयवार एकत्रित करून आणि त्यांची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ नुसार शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक एमएससी – १०८१/४/एम्सीएसबार-सेल, दिनांक २३ जुलै १९८१ या अन्वये हे नियम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले असून,दिनांक १५ ऑगस्ट १९८१ पासून ते अंमलात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या इंग्रजी प्रकाशनात ३१ मे १९८५ पर्यंत अरे ज्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यांचा म अंतर्भाव करून हे रजा धोरण अद्यावत करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २७ जून १९८५ या राजपत्रात यासंदर्भात अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Types Of Employees Leaves
1) अर्जित रजा :- दीर्घ सुट्टी मिळणाऱ्या विभागाशिवाय अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना सदरील अर्जित रजा मिळवण्याचा अधिकार आहे. साधारणपणे एखादा कर्मचाऱ्याला एकावेळी १२० दिवस एवढीच कमाल अर्जित रजा मंजूर करता येते.जेव्हा शासकीय कर्मचाऱ्याला देय असलेली अर्जित रजा १८० दिवस झाल्यावर अशी रजा अर्जित होणे बंद होते.
राज्य कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीच्या कालावधीत अर्जित केलेल्या रजेचा लाभ घेण्याचा अधिकार आहे.रजेवर जाण्यापूर्वी कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराइतके रजा वेतन मिळेल.
2) अनर्जित रजा :- संपूर्ण सेवेच्या कालावधीतील अनर्जित रजा कमाल ३६० दिवसांपर्यंत मर्यादित असते. वैद्यकीय प्रमाणपत्रा शिवाय अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त ९० दिवस आणि सर्व मिळून जास्तीत जास्त १८० दिवस इतकी अनर्जित रजा मिळू शकते.
शासकीय कर्मचाऱ्यांची जेवढी अर्धवेतनी रजा,अर्जित असते त्या रजेच्या खाती अनर्जित रजा खर्ची टाकल्या जातात.कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणास्तव वेतन न घेता रजा घेण्याची परवानगी आहे.अनर्जित रजेवर असताना कर्मचाऱ्याला कोणतेही रजा वेतन मिळणार नाही.अनर्जित रजेचा जास्तीत जास्त कालावधी 30 दिवसांचा आहे.
3) अर्धवेतनी रजा :- मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्याला त्याने पूर्ण केलेल्या एकूण सेवेच्या प्रत्येकी २० दिवसांची अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असतो.सदरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्रांवर अथवा खाजगी कामासाठी घेता येते मात्र, कायम सेवेत नसलेला शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत यावे लागते.
शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास अर्धवेतन रजा मिळू शकते.अर्धवेतन रजेवर असताना कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराचा निम्मा भाग रजा वेतन म्हणून मिळेल.अर्धवेतन रजेचा जास्तीत जास्त कालावधी 180 दिवसांचा आहे.
4) परिवर्तित रजा :- परिवर्तित रजा ही शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेली एक विशेष रजा योजना आहे. या योजनेनुसार, कर्मचारी त्यांना मिळणाऱ्या अर्धवेतनी रजेच्या निम्मे दिवस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पूर्ण वेतन असलेल्या रजेत रूपांतरित करू शकतात.
परिवर्तित रजा मिळण्यासाठी, कर्मचारी शासकीय सेवा नियमांनुसार अर्धवेतनी रजेसाठी पात्र असणे आवश्यक आहे.रजा मंजूर करणारा अधिकारी यांना खात्री पटली पाहिजे की कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत येण्यास सक्षम आहे.
रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकान्याला लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यताप्राप्त पूर्णकालीन किंवा अंशकालीन शिक्षणक्रमासाठी आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्याकरिता देखील सेवेच्या संपूर्ण कालावधीत कमाल ९० दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येईल.
5) असाधारण रजा :- असाधारण रजा ही बिनपगारी रजा असते जी सरकारी कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत मंजूर केली जाऊ शकते.कर्मचाऱ्याला अत्यंत आकस्मिक परिस्थितीत असाधारण रजा मिळू शकते.असाधारण रजेवर असताना कर्मचाऱ्याला कोणतेही रजा वेतन मिळणार नाही.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेचे नियम
- वैद्यकीय कारणे :- जर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असतील आणि त्यांना दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असेल. यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- शिक्षण : उच्च शिक्षणासाठी किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी रजा.
- अन्य असाधारण परिस्थिती : लग्न, मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, किंवा इतर अत्यंत कठीण परिस्थिती ज्यामुळे कर्मचाऱ्याला कामावर उपस्थित राहणे अशक्य होते.
- अर्ज :- कर्मचाऱ्याने लेखी अर्ज करून, रजा घेण्याचे कारण आणि रजेचा आवश्यक कालावधी स्पष्टपणे नमूद करून असाधारण रजा मंजूर करण्याची विनंती करावी.
- पुरावे :- वैद्यकीय प्रमाणपत्रे, शिक्षणासाठी प्रवेश पत्रे, किंवा इतर संबंधित कागदपत्रे यासारखे पुरावे अर्जाबरोबर सादर करणे आवश्यक आहे.
- मंजूरी :- अर्ज आणि पुरावे संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजूर केले जातील. रजेचा कालावधी आणि रजा मंजूर/नकाराची अधिकृत सूचना कर्मचाऱ्याला दिली जाईल.
- एकूण रजा :- कोणत्याही एका वेळी तीन महिन्यांपेक्षा जास्त असाधारण रजा मंजूर केली जाणार नाही.
- सेवा : कर्मचाऱ्याने तीन वर्षांची संतत सेवा पूर्ण केली असेल तरच वैद्यकीय कारणास्तव सहा महिन्यांपर्यंत रजा मंजूर केली जाऊ शकते.