Health Insurance : हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?आरोग्य विमा घेतल्याने कुटुंबासह आपल्याला मिळतात असंख फायदे ; पहा सविस्तर ..

Health Insurance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आरोग्य हीच संपत्ती आहे परंतु आजकालच्या दगदतीच्या काळामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे अशावेळी आजच्या महागाईच्या काळात वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक नियोजनावर ताण येत आहे अशा परिस्थितीत योग्य नियोजन केले तर,साह्याने आपण आरोग्य विमा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्या दरम्यानचा करार असतो ज्यामध्ये वैद्यकीय खर्चाची भरपाई दिली जाते. 

आरोग्य विम्याचे फायदे | Health insurance Benefits 

आपण आरोग्य विमा घेतला तर आपल्याला अनेक फायदे होतात. त्यापैकी काही महत्त्वाचे फायदे या लेखांमध्ये पाहणार आहोत.

आर्थिक संरक्षण :- रुग्णालयात उपचार घेणे खूप महाग झाले आहे यामध्ये जर शस्त्रक्रिया औषधे खोली भाडे इत्यादीचा समावेश असेल तर आपल्याला नाकीनो येऊ शकतात अशावेळी आरोग्य विमा घेतलेला असल्यास हा सर्व खर्च विमा कंपनीकडून पेड केल्या जात असतो.त्यामुळे तुमच्या दवाखान्यातील औषध उपचारावर आपल्या खिशातून खर्च होत नाहीत आणि आर्थिक अडचण निर्माण होत नाही.

मानसिक शांतता :- मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आजारपण हा अतिशय तणावाचा अनुभव असतो त्यामध्ये आरोग्याबरोबरच आर्थिक तास सुद्धा येतो त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. आपण जर हेल्थ इन्शुरन्स घेतले असेल तर आपली आर्थिक परिस्थिती कशी जरी असली तरी विमा कंपनीकडून दवाखान्याचा खर्च दिला जातो,त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता आणि उपचार शांतपणे घेऊ शकता.

कौटुंबिक सुरक्षा :– आरोग्य विमा फक्त तुमचेच नव्हे, तर तुमच्या कुटुंबाचेही संरक्षण करतो. तुम्ही फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतल्यास तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होतो.त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आले तरी आरोग्य विमा मदत करते.

कॅशलेस उपचार : हेल्थ इन्शुरन्स सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण कॅशलेस उपचार घेऊ शकतो म्हणजे आपल्याकडे एक रुपया सुद्धा नसताना विमा कंपनीच्या साह्याने आपल्यावरती दवाखान्यात उपचार सुरू होतात,म्हणजेच उपचार घेतल्यानंतर रुग्णालयाला थेट विमा कंपनीकडून पेमेंट केले जाते. त्यामुळे उपचाराच्या खर्चासाठी तुम्हाला मोठी रक्कम जमा करावी लागत नाही.

कर सूट :- आरोग्य विमाधारकांना आयकर सूट मिळते. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्य विमावरील प्रीमियम रक्कमेवर तुम्ही इन्कम टॅक्स सूट मिळवू शकता.

मोठे आजार संरक्षण : बऱ्याच आरोग्य विमा योजनांमध्ये गंभीर आजारांसाठी संरक्षण मिळते.जसे की हृदयाचे आजार, कॅन्सर इत्यादी.अशा आजारांवर उपचार खूप महाग असतात.पण आरोग्य विमा असल्यास या आजारांवर उपचारासाठीही आर्थिक मदत मिळते.

Leave a Comment

error: Don't Copy!!