Electricity Saving Tips : आता दिवसभर जोमाने चालवा फॅन टिव्ही,हिटर-गीझर! वीज बील असे येणार कमी …

Electricity Saving Tips : आज आम्ही तुम्हाला काही खास पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही दर महिन्याच्या वीज बिलात बचत करू शकता. या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर गिझर आणि हिटर चालवताना जास्त बिल लागणार नाही.

How to save Electricity

आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक वीज बिलांचे टेन्शन वाढतायच चालले आहे.पण चिंता करू नका! अगदी साध्या-सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घरगुती वीज वापरावर नियंत्रण ठेवू शकता.तुमचे वीजबबीलही कमी करू शकता.चला तर मग, वीज वाचप करण्यासाठी काही टिप्स

दिवा आणि उपकरणे :- सर्वात सोपा पण प्रभावी मार्ग म्हणजे तुमची खोली सोडताना दिवा आणि इतर उपकरणे बंद करणे. थोडा वेळ वापरात नसले तरीही, प्लग बंद करणे हा वीज वाचपाचा सोपा उपाय आहे.

LED बल्ब वापर : पारंपरिक बल्बांपेक्षा LED बल्ब कमी वीज वापरतात आणि त्यांचे आयुष्यही जास्त असते. यामुळे तुमच्या घरातील सर्व बल्ब बदलून LED टाकावे.

पंख्याचा वापर :- एसीपेक्षा पंखा कमी वीज खातात आणि चांगली हवा खेळवतात.गरमीच्या दिवसांत AC ऐवजी फॅन वापरून बिल कमी करवे.
जुन्या उपकरणांची देखभाल :- आपल्या घरात असलेल्या जुन्या, बिघडलेल्या उपकरणांमुळे वीज जास्त लगते. सदरील उपकरणे नियमितपणे तपासून दुरुस्त करून घ्यावे.खराब झालेल्या उपकरणे बदलण्याचा विचार करा.

उन्हाचा फायदा घ्या :- दिवसा खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि नैसर्गिक प्रकाश वापरावा रात्री घरात दिवा वापरण्याऐवजी बाहेर दिवा वापरावा.

वीजबिल कसे कमी येईल?

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर :- इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्टॅन्डबाय मोड बंद करावे.टिव्ही,संगणक, आणि इतर उपकरणे वापरात नसताना स्टॅन्डबाय मोडमध्ये ठेवू नका. याची प्लग बंद करावी.

स्मार्ट उपकरणांचा वापर :- स्मार्ट प्लग आणि थर्मोस्टॅट्स वापरून तुम्ही तुमच्या वीज वापरावर अधिक चांगले नियंत्रण मिळवू शकता. सदरील उपकरणांमुळे अनावश्यक वीज वापर टाळता येईल.

Water Geyser :- जेव्हा आपण पाणी गरम करण्यासाठी गिझर वापरतो.गीझरचे पाणी गरम करायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही 5 स्टार रेटिंग असलेले गिझर वापरावे. पंचतारांकित गीझर कमी वीज वापरतात.

Room Heater :- रूम हीटरच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत खोलीत रूम हीटर वापरताना खिडकी किंवा दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच वीज वाचवण्यासाठी तुम्ही पोर्टेबल रूम हीटर वापरू शकता.

Leave a Comment

error: Don't Copy!!