8th Pay Salary Hike : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच आठवावेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेतन आयोगाचे काम लवकर सुरू होणार असल्याचे संकेत नुकतेच लोकसभेत दिलेले आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच केंद्र सरकारकडे सादर केल्या जाणार आहेत.
8th Pay Commission Salary Hike
आयोगाचे कामकाज साधारणपणे एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना होत असते.आठव्या वेतन आयोगाचा सर्वात मोठा परिणाम महागाई भत्त्यावर होईल.
तज्ज्ञांच्या मतानुसार महागाई भत्ता लवकर शून्य तेलात येणार असून नवे वेतन आयोग लागू झाल्यास महागाई भत्ता 0 करण्यात यानंतर वेगवेगळ्या भत्त्यामध्ये सुधारणा करून नवीन वेतन गणना सुरू करण्यात येते तर कसे असणार नवीन वेतन आयोगामध्ये वेतन, भत्ते पेन्शन याची सविस्तर माहिती आपण त्याला त्यात पाहणार आहोत.
आठवा वेतन आयोग लवकर लागू व्हावा यासाठी कर्मचारी वाट पाहत आहे. मागील वेतन आयोगाचा विचार करायचा झाल्यास वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर साधारणपणे दोन वर्षात वेतन आयोग लागू झाला.थोडक्यात सातवा वेतन आयोग 1 जनवरी 2016 पासून लागला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जवळपास 2 वर्षाचा कालावधी लोटला.
आता आठव्या वेतन आयोगाचा विचार करायचा झाल्यास वेतन आयोगाची स्थापना झालेली आहे साधारणपणे एक जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होईल परंतु त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार केव्हा करेल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार केव्हा वेतन आयोग लागू करते याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यातील विविध संवर्गाना कसा लाभ मिळतो याविषयी आपण थोडी नजर टाकणार आहोत मित्रांनो कॉन्स्टेबल,शिक्षक,सैनिक दलातील विविध कर्मचारी, आरोग्य सेवा,तलाठी इ. कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा कसा फायदा होणार ? हे आपण थोडक्यात पाहूया..
आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
नवीन वेतन आयोगात पगार वाढण्यामागे फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा असतो. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता.आता आठव्या वेतन आयोगात तो 2.86 पर्यंत वाढवण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जो 18000 रुपये आअसेल तर तो थेट 51480 रुपये होईल.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास, पोलीस, शिक्षक आणि लष्करी जवानांच्या पगारात किती वाढ होईल ?
पोलीस हवालदार
- सध्याचा मूळ पगार (सातवा वेतन आयोग) : २१,७०० रुपये प्रति महिना
- आठवा वेतन आयोग लागू झाल्यास (फिटमेंट फॅक्टर २.८६ असल्यास): ६२,०६२ रुपये प्रति महिना
- वाढ : सुमारे ४०,००० रुपये
शिक्षक
- सध्याचा मूळ पगार (सातवा वेतन आयोग): ९,३०० ते ३५,४०० रुपये प्रति महिना
- आठवा वेतन आयोग लागू झाल्यास (फिटमेंट फॅक्टर २.८६ असल्यास) : २६,५९८ ते १,०१,२४४ रुपये प्रति महिना
लष्करी जवान
- सध्याचा मूळ पगार (सातवा वेतन आयोग): २१,७०० रुपये प्रति महिना
- आठवा वेतन आयोग लागू झाल्यास (फिटमेंट फॅक्टर २.८६ असल्यास): ५१,४८० रुपये प्रति महिना
लष्करी जवानांना मिळणारे अतिरिक्त भत्ते लक्षात घेता, त्यांच्या एकूण पगारात आणखी वाढ होऊ शकते.