8th Pay Commission : देशभरातील केंद्रीय कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण हा आयोग लागू झाल्यानंतर त्यांच्या मूळ वेतनात (Basic Salary) वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारने यापूर्वीच आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली असली तरी, यासाठी तीन सदस्यीय पॅनेलची (Three member panel) रचना होणे बाकी आहे.
8th Pay Commission update
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट दिले होते. त्यांनी लोकसभेत सांगितले की सरकारने संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence), गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs), कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (Department of Personnel and Training) आणि राज्यांसारख्या प्रमुख भागधारकांकडून ‘टर्म ऑफ रेफरन्स’ (ToR) वर सूचना मागवल्या आहेत.
अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली की सध्या भारतात सुमारे 36.57 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central government employees) आणि 33.91 लाख निवृत्तीवेतनधारक (Pensioners) आहेत.
नवीन वेतन आयोगामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यांनी सांगितले की 8 व्या वेतन आयोगाचा लाभ संरक्षण दलातील कर्मचारी आणि त्यांच्या निवृत्तीवेतनधारकांनाही (Defence personnel and pensioners) मिळेल.
कर्मचाऱ्यांच्या किती फिटमेंट फॅक्टर वापरला जाईल?
कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी कोणता फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) वापरला जाईल, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी 1.92, 2.28 आणि 2.86 या फिटमेंट फॅक्टरपैकी एकाचा वापर केला जाऊ शकतो.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30,200 रुपये असेल, तर 8 व्या वेतन आयोगात 1.92, 2.28 आणि 2.86 फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर त्यांच्या पगारात किती वाढ होईल? जर तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल, तर आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती देणार आहोत.
70 हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन
- 1.92 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,34,400 रुपये
- 2.28 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,59,600 रुपये
- 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार : 2,02,200 रुपये
61 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल?
- 1.92 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,17,120 रुपये
- 2.28 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,39,080 रुपये
- 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,74,460 रुपये
50,400 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल?
- 1.92 फिटमेंट फॅक्टरनुसार : 96,768 रुपये
- 2.28 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,14,912 रुपये
- 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,44,144 रुपये
40,600 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढेल?
- 1.92 फिटमेंट फॅक्टरनुसार : 77,952 रुपये
- 2.28 फिटमेंट फॅक्टरनुसार : 92,568 रुपये
- 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार : 1,16,116 रुपये
30,200 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे अंदाजित सुधारित वेतन
- 1.92 फिटमेंट फॅक्टरनुसार : 57,984 रुपये
- 2.28 फिटमेंट फॅक्टरनुसार : 68,856 रुपये
- 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार : 86,372 रुपये
20,300 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे अंदाजित सुधारित वेतन
- 1.92 फिटमेंट फॅक्टरनुसार : 38,976 रुपये
- 2.28 फिटमेंट फॅक्टरनुसार : 46,284 रुपये
- 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार : 58,058 रुपये